Chandrakant Patil, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : अजितदादांची नवी चाल; अर्थखात्यापाठोपाठ पुण्याचे पालकमंत्रीपदही हिसकावणार ?

Sunil Balasaheb Dhumal

Ajit Pawar And Pune Guardian Minister : राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होताच शिंदे गटात धूसफुस सुरू झाली. सरकारसाठी पुरेसे संख्याबळ असतानाही अजित पवार यांच्या गटाला सहभागी करून घेण्याची गरज नव्हती, अशी भूमिका शिंदे गटाची आहे. मंत्रिमंडळात वाटेकरी होणार असल्याने शिवसेनेसह भाजपच्या गोटातही नाराजीचे वातावरण होते. अजित पवार यांना अर्थखाते देऊ नये, यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांसह आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गळ घातली होती. (Latest Political News)

शिंदे गटातील राष्ट्रवादी काँग्रेसबाबतची वाढलेली नाराजी, भाजपकडील अतिरिक्त खांत्याबाबत फेरविचार आदी कारणांमुळे खातेवाटप रखडले होते. दरम्यान, मोठी नाराजी असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखाते मिळाले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर मंत्र्यांनाही तोलामोलाची खाती मिळालेली आहेत. आजच्या खातेवाटपातून अजित पवार यांनी आपण हवे ते मिळवतोच याची पुन्हा एकदा प्रचिती करून दिली आहे.

राज्य सरकारमध्ये अर्थखाते मिळाल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या भाजप नेते चंद्रकात पाटील हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. महाविकास आघाडी आणि त्यापूर्वीच्या सरकारमध्ये पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होते. सध्या अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. राजशिष्टाचाराप्रमाणे हे पद मोठे आहे. त्यामुळे चंद्रकात पाटील यांच्या समवेतच्या बैठकीला अजित पवार उपस्थित राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांना मिळावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटाने जोर लावल्याचे दिसून येत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, "अजित पवार यांना पुणे जिल्ह्यातील सर्व गावांची माहिती आहे. त्यांच्या प्रशासनावर चांगला वचक आहे. यामुळे जिल्ह्यातील विकासकामे वेळेत मार्गी लागण्यास मदत होईल."

राज्यात अजित पवार त्यांना हवे ते मिळवतात, अशी ओळख आहे. त्यानुसार त्यांनी अर्थखाते मिळवले आहे. आता पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळवणार का याकडे लक्ष लागले आहेत. या चर्चांवरून भाजपचे चंद्राकांतदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा कोण होणार, याकडे पुण्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT