Eknath Shinde News : तडजोड करावीच लागते; खातेवाटपावर मुख्यमंत्री शिंदेंची नरमाईची भूमिका

Eknath Shinde On Ajit Pawar : शिंदेंचा आपल्या नाराज आमदारांना संदेश
Eknath Shinde, Ajit Pawar
Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama

Maharashtra Khate Vatap : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्ताप्रवेश आणि त्यांच्या वाट्याची खात्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह त्यांच्या गोटातील ४५ आमदार नाराज असल्याचे दिसून आले. पण आता हे सरकार स्थिर होऊन समान खाते वाटप झाल्यानंतर मात्र युतीचा 'फॉर्म्युल्या'चा दाखल देत मुख्यमंत्री शिंदेंनी नव्या खातेवाटपाबाबत मावळ भूमिका घेतली. यानिमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांशी लगेचच जुळवून घेतल्याचेही स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता त्यांचे समर्थक आमदारांमध्ये नवा मेसेज जाऊ शकतो. (Latest Political News)

Eknath Shinde, Ajit Pawar
Pimpri-Chinchwad : विद्या चव्हाणांनी हकालपट्टी केलेल्या कविता आल्हाटांना रूपाली चाकणकरांनी 24 तासातच पदावर बसवले

गेल्या वर्षी बंड केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या इतर आमदारांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली होती. महाविकास आघाडीत अजित पवार अर्थमंत्री होती. त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना पुरेशा निधी दिला नाही, असा आरोप केला. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना पाठबळ देऊन शिवसेनेच्या आमदारांची ताकद कमी करत असल्याचेही शिंदे गटातील आमदारांनी बोलून दाखवले होते. आता अजित पवार यांचा गटच राज्य सरकारमध्ये सहभागी झाला आहे.

Eknath Shinde, Ajit Pawar
Ajit Pawar News : अजित पवार थेट 'सिल्व्हर ओक'वर गेले अन् प्रतिभाकाकींना भेटले ! आता काय घडले ?

राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये आल्यानंतर शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली होती. तसेच शिंदे गटातील आमदारांनी अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यासही तीव्र विरोध दर्शवला होता. महाविकास आघाडीतून ज्या कारणाने बाहेर पडलो तेच आता होणार असेल तर मतदारसंघात काय सांगायचे, असा प्रश्न संबंधित आमदारांनी उपस्थित केला होता. शिंदे गटाचा मोठा विरोध असतानाही अजित पवारांना अर्थखातेच मिळाले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना तोलमोलाची मंत्रिपदे मिळाली आहेत.

Eknath Shinde, Ajit Pawar
High Court News : उच्च न्यायालयाचा दणका ; 'त्या' 25 अनधिकृत होर्डिंगवरील स्थगिती उठवली; कारवाईचा मार्ग मोकळा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना खातेवाटप करताना शिंदेच्या गोटातील दोन खातीही बदलली आहेत. यात मंत्री अब्दुल सत्तारांकडे असलेले महत्वाचे कृषीमंत्रालय काढून धनंजय मुंडे यांना देण्यात आले आहे. तर संजय राठोड यांच्याकडे असलेले अन्न व औषध व प्रशासन मंत्रालय धर्मरावबाबा अत्राम यांना देण्यात आले आहे. यावरून कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छेडले.

यावेळी शिंदे म्हणाले, "युतीचे सरकार म्हटले की तडजोड करावीच लागते. आता खातेवाटप झाले आहे. हे खातेवाटप युतीच्या फॉर्म्यूल्यानुसारच करण्यात आले आहे. याबाबत कुणीही नाराज नाही. आता सरकार स्थिर झाले आहे. यामुळे राज्यातील विकासकामे अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com