Ajit Pawar on Baramati Medical College Sarkarnama
पुणे

Ajit Pawar on Medical College: कॉलेजच्या नामकरणावेळी बारामतीकरांना बरोबर घ्यायला हवं होतं; अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी

Government Medical College Baramati : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज बारामतीत आयोजित मेळाव्यात बोलत होते.

सरकारनामा ब्युुरो

Baramati News : राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली. पण आता राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. "बारामती मेडिकल कॉलेजच्या नामकरणाच्या निर्णयावेळी बारामतीकरांना बरोबर घेऊन हा निर्णय घ्यायला हवा होता", असं म्हणत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने सांगलीत आज महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बारामतीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले, "बारामती मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय मेडिकल कॉलेज नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला. बारामती मेडिकल कॉलेजला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याने आम्हाला सर्व बारामतीकरांना आनंद झाला. कारण आपण सर्व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराने चालतो. आपण सर्वजण त्यांचा आदर्श घेतो", असं ते म्हणाले.

"बारामती मेडिकल कॉलेजच्या नामकरणाच्या निर्णयाबाबत आमच्या मनामध्ये कुठलीही खोट नाही. मात्र, आमचं म्हणणं एवढंच आहे की, हा निर्णय घाईगडबडीत घेण्यापेक्षा बारामतीकरांना सोबत घेऊन घ्यायला हवा होता", अशी खंत यावेळी अजित पवार यांनी बोलून दाखवली.

ते पुढे म्हणाले, "या मेडिकल कॉलेजच्या नावात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या सोबतच बारामती मेडिकल कॉलेज असाही उल्लेख राहायला हवा, याबाबत मी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. याबरोबरच या मेडिकल कॉलेजला जसं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नावं दिलं, तसं त्यांच्या नावाला साजेसं काम देखील झालं पाहिजे, यामध्ये कोणतीही तडजोड आम्ही बारामतीकर स्वीकारणार नाहीत", असंही अजित पवार म्हणाले.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT