Maratha Mandir Sanstha : पवारांच्या अनुभवाचा फायदा घ्यायला काय हरकत आहे?, बरोबर ना चंद्रकांतदादा? ; मुख्यमंत्र्यांच्या गुगलीने संभ्रम वाढला

ठाणे महापालिकेचं मोठं क्रीडांगण होतं. त्याला शरद पवारांचं नावं द्यायचं होतं. त्या ठिकाणी सत्ता आमची हेाती. त्यावेळी असं का? तसं का? असं जरासं झालं.
Sharad Pawar-Eknath shinde
Sharad Pawar-Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मराठा मंदिर संस्थेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला आमंत्रण दिलं होतं. मी त्यांना येण्याचा शब्द दिला होता, त्यानुसार कार्यक्रमाला येऊन मी शब्द पाळला. राज्यातील एखादा विषय असेल, तर ते आवर्जून फोन करून सूचना देतात. पवारांचा अनुभव मोठा आहे, त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यायला काय हरकत आहे? चंद्रकांतदादा बरोबर ना? अशी गुगली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकली (What's wrong with taking advantage of Sharad Pawar's experience? : Eknath Shinde)

मराठा मंदिर संस्थेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, पवारांनी राजकारणापलिकडे मित्र निर्माण केले आहेत. आता माझा पक्ष वेगळा आणि त्यांचा पक्ष वेगळा आहे. राज्यातील एखादा विषय असेल तर ते आवर्जून फोन करतात, सांगतात. असं केलं तर मार्ग निघू शकतो, असं ते सूचवतात. शेवटी त्यांच्याकडे अनुभव आहे. राज्याला फायदा व्हावा, असा त्यांचा त्यामागील उद्देश असतो. त्यांचं मनही मोठं आहे.

Sharad Pawar-Eknath shinde
KCR Tour In Solapur : केसीआर अन॒ त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ उद्या सोलापूर मुक्कामी; तीन हॉटेल बुक, नव्या घोषणेची शक्यता

एकदा असाच प्रसंग आला होता. ठाणे महापालिकेचं मोठं क्रीडांगण होतं. त्याला शरद पवारांचं नावं द्यायचं होतं. त्या ठिकाणी सत्ता आमची हेाती. त्यावेळी असं का? तसं का? असं जरासं झालं. पवारांनी त्यांचे पदाधिकारी हणमंत जगदाळे यांना सांगितलं की, वादविवाद करू नका. तुम्ही एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटा. ते माझ्याकडे आलं, त्यानंतर आम्ही तो कार्यक्रम आयोजित केला. पवार आणि मीही त्या व्यासपीठावर होतो. आम्ही तो समारंभ केला. राजकारण हे निवडणुकीपुरतं ठीक आहे. शेवटी आपण जीवाभावचं माणसं आहोत. सर्वसामान्यांसाठी काम केलं पाहिजे. पवारसाहेब हे कधीकधी फोन करतात, त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यायला काय हरकत आहे, चंद्रकांतदादा बरोबर ना?, असा सवाल त्यांनी पाटील यांना केला.

Sharad Pawar-Eknath shinde
Bhagirath Bhalke Will Join BRS : सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का; भगीरथ भालके २७ जूनला BRSमध्ये प्रवेश करणार

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, स्वातंत्रपूर्व ब्रिटीश काळात संस्था सुरू करणं, हे सोपं काम नव्हतं. अशा या संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं, हे मी माझं भाग्य समजतो. पवारांनी मला एकदा फोनवरून, तर एकदा वर्षा बंगल्यावर येऊन आमंत्रण दिलं होतं. खरं म्हणजे फोनवरून दिलेलं आमंत्रण मला पुरेसं होतं. पण वर्षावर येऊनही निमंत्रण दिलं. मी त्यांना सांगितलं होतं की, मी मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाला नक्की येणार. येणार म्हणजे येणार. मी सकाळी माझ्या साताऱ्यातील गावी होतो. पाऊस पडायला लागला. हेलिकॉप्टर बंद, पण रस्तेमार्गाने आलो. मी शब्द दिला होता की, मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाला येणार, त्यानुसार कार्यक्रमाला आलो आहे.

Sharad Pawar-Eknath shinde
Siddaramaiah In Sangli : दुष्काळी जतला पाणी द्या अन्‌ बेळगावातील आमच्या मराठी भाषिकांना जपा ; विश्वजित कदमांची सिद्धरामय्यांना विनंती

आता पवार अध्यक्ष असल्यामुळे काही चिंता नाही

शिक्षण क्षेत्राच्या भरीव वाटचालीमध्ये मराठा मंदिर संस्थेचं योगदान मोठं आहे, हे कोणालाही नाकारता येत नाही. आता तर शरद पवार अध्यक्ष आहेत, त्यामुळे काही चिंता नाही. पवार हे केवळ राजकीय नेतेच नाहीत, तर अनेक संस्था उभ्या केल्या आहेत. तसेच अनेक संस्थांच्या पाठीशी उभे राहून त्यांना पाठबळ दिलं. त्यांना मार्गदर्शन केलं. त्यांचा अनुभव संस्थांना मिळतो आणि त्या चांगलं काम करू लागतात, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

Sharad Pawar-Eknath shinde
Solapur DCC Bank : आमदार राऊतांच्या याचिकेने बडे नेते अडचणीत; ‘RBI’ने ठोठावलेला पाच लाखांचा दंडही 'त्या' संचालकांकडून वसूल होणार

मी मुख्यमंत्री म्हणून येणं.... हा योगायोग असावा

संस्था अनेक निर्माण होतात. सातत्याने या संस्था कार्यरत राहणं, टिकणं आणि पुढं नेणं. हे सोपं काम नसतं. त्याला तळमळीचं माणसं लागतात. आपल्या सर्वांसाठी मराठा मंदिर संस्था गौरव आहे. या संस्थेचा २०२० लाच अमृतमहोत्सव साजरा व्हायला हवा होता. मात्र, कोविडमुळे तो आपल्याला करता आला नव्हता. योगायोग असावा की, मी मुख्यमंत्री म्हणून येथे येणं....याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. शरद पवारांना धन्यवाद देतो की, त्यांनी मला कार्यक्रमाला बोलावलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com