NCP leader join BJP
NCP leader join BJP Sarkarnama
पुणे

सरकार बदलल्याचा इफेक्ट इंदापुरात दिसला; राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

संतोष आटोळे

इंदापूर (जि. पुणे) : राज्यात सरकार बदल्याचा इफेक्ट इंदापुरात (indapur) दिसला. गेल्या अडीच-तीन वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेले माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या गोटात बऱ्याच दिवसानंतर जल्लोष झाला आहे. इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती कांतिलाल बोराटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP)अर्थात माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची साथ सोडत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. (NCP leader from Indapur joins BJP)

इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती कांतीलाल बोराटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आपल्या सहकाऱ्यांसमवेत भाजपमध्ये अर्थात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गोटात प्रवेश केला आहे. इंदापूर अर्बन बँकेच्या सभागृहात झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमास पाटील उपस्थित होते. त्यांनी कांतीलाल बोराटे व त्यांच्या सहकाऱ्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.

यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी (आमदार दत्तात्रेय भरणे) केवळ खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. या खोट्या आश्वासनांना जनता बळी पडली होती. सध्याचे सरकार हे जनतेचे सरकार असून कांतीलाल बोराटे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व जनतेच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

विरोधी पक्षातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी तालुका लोकप्रतिनिधींवर नाराज आहेत. आगामी काळात ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत, असेही हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराम जाधव, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलास वाघमोडे, पिंटू काळे व पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, मागील आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामतीच्या दौऱ्यावर आले असताना माजी मंत्री पाटील यांनी राज्यात सरकार बदलेले आहे. पण पुणे जिल्ह्यात अजूनही तसे जाणवत नाही, अशी खंत व्यक्त केली होती. त्यानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादीच्या नेत्याने भाजपत प्रवेश करत सरकार पुण्यातही सरकार बदल्याचे दाखवून दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT