अब्दुल सत्तारांना फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीतच झापले; ‘तो निर्णय तुम्ही जाहीरच कसा केला?’

फडणवीस यांचा तो पवित्रा पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मंत्र्यांना कडक शब्दांत समज दिली
Devendra Fadnavis- Abdul Sattar
Devendra Fadnavis- Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : सवंग घोषणा करणाऱ्या उतावीळ मंत्र्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वांसमोर झापले. कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका, अशा शब्दांत त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यासह अतिउत्साही मंत्र्यांना फटकारले. फडणवीस यांचा तो पवित्रा पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही मंत्र्यांना कडक शब्दांत समज दिली, त्यामुळे अनेक मंत्र्यांची पंचाईत झाली. (Devendra Fadnavis scolded Abdul Sattar in the cabinet meeting itself)

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून काही मंत्री परस्पर माध्यमांमध्ये घोषणा करत आहेत. त्या घोषणा पूर्ण न झाल्यास अडचण होऊ शकते, हे लक्षात घेऊन फडणवीस यांनी मंत्र्यांना वठणीवर आणले आहे. शेतकरी कृषी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही अशी योजना राबवायची की केंद्र सरकारच्या योजनेत राज्याचा वाटा मिसळून ती मदत शेतकऱ्यांना द्यायची, याबाबत मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे अधिकारी आणि सचिवांशी बोलणी करत आहेत. त्या योजनेला मूर्तरुप येण्याच्या अगोदरच ती बातमी फुटली आणि प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर झाली. त्यामुळे फडणवीस नाराज झाले.

Devendra Fadnavis- Abdul Sattar
मी तर चोरांचा सरदार... : कृषिमंत्र्यांचे अजब विधान!

कोणताही निर्णय झालेला नसताना तुम्ही ही माहिती जाहीर कशी केली, असा जाबच देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना विचारला. मंत्रिमंडळाच्या बैठकीतच धारेवर धरण्यात आल्याने कृषीमंत्री सत्तार यांची पाचावर धारण बसली. एकाकी विचारणा झाल्याने काय बोलावे ते त्यांना कळेना. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांना खडसावले. आपण निर्णय झाल्याचे जाहीर केले नाही, त्याबाबत विचार सुरू आहे, असे सांगितल्याचे उत्तर सत्तारांनी दिले. मात्र, त्यावर फडणवीसांचे समाधान झाले नाही.

Devendra Fadnavis- Abdul Sattar
सरकार कोसळल्यानंतर शरद पवार प्रथमच घेणार महाविकास आघाडीची बैठक

सरकारचा कोणताही निर्णय जाहीर करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना असतो. एखाद्या योजनेबाबत मंत्रिमंडळाच्या स्तरावर विचारविनिमय सुरू असताना त्याची घोषणा केल्यास त्यांचे गांभीर्य राहत नाही. त्यामुळे कोणतीही घोषणा करताना आमच्याशी चर्चा करा. परस्पर घोषणा करू नका, असा सज्जड दम फडणवीस यांनी दिल्याने सत्तारांची बोलती बंद झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com