Raj Thackeray
Raj Thackeray  Sarkarnama
पुणे

राज ठाकरेंनी उद्या संघाची चड्डी घातली तर नवल वाटणार नाही!

उत्तम कुटे: सरकारनामा ब्युरो

पिंपरी : `मनसे`चे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कालच्या (ता.१२) ठाण्याच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर तुफान हल्ला चढवला. त्यावर तशाच प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसमधून ((NCP) लगेच आल्या आहेत. राज ठाकरेंना महत्व देऊ नका,या एका वाक्यात अजित पवारांनी या टीका झटकून टाकली. तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) बाहुपाशात गेलेल्या राज ठाकरेंनी उद्या संघाची चड्डी घातली तर नवल वाटणार नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आणि प्रदेश युवक कार्याध्यक्ष रवीकांत वरपे यांनी आज (ता.१३) केला. त्यांनी राज ठाकरेंना महाराष्ट्राचे बहुरूपी नेते अशी उपमा दिली आहे.

वरपे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे 370 कलम, काश्मीर पंडितांवरील अन्याय, समान नागरी कायदा, मशिदीवरील भोंगे हे संघाचे मुद्दे राज ठाकरे सध्या आपल्या भाषणातून मांडताहेत. त्यातून ते आरएसएसच्या पूर्णपणे बाहुपाशात गेले आहेत, हे स्पष्ट दिसत आहे. शरद पवार हे जातीयवादी नेते, देव धर्म मानत नाहीत, एका धर्माचे लांगुलचालन करीत आहेत, हा प्रचार संघ गेली गेली अनेक दशके पवार साहेबांच्या विरोधात करत आहे.

संघाप्रमाणे आता फक्त राज ठाकरे सभेच्या माध्यमातून पवारांच्या विरोधात प्रचार सुरू केला आहे, हे स्पष्ट झाले. त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून येते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. उद्या बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चर्य वाटणार नाही. कारण राज ठाकरे हे संघाच्या बाहुपाशात गेलेले नेते आहेत, असा हल्लोबल वरपेंनी केला.

महाराष्ट्रात नवीन जॉनी लिव्हर

राज्याच्या राजकीय पटलावर एक नवीन जॉनी लिव्हर जन्माला आला, असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. ते म्हणाले की, राज ठाकरे यांना चार दिवसांत उत्तरसभा का घ्यावी लागली. कारण कार्यकर्ते, समाजात असलेली अस्वस्थता होती. एक नवीन जॉनी लिव्हर राजकीय व्यासपीठावर सापडलाय, असं म्हटलं जात आहे. महाराष्ट्र लवकरच आपल्याला जॉनी लिव्हर म्हणून ओळखेल. जगात हास्यविनोद करणारे हे जगात खूप आहेत. आपणही आहात, असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT