केजरीवालांनी डावलताच मुख्यमंत्री तातडीनं मंत्रिमंडळ बैठक बोलावून घेणार मोठा निर्णय

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तातडीनं मंत्रिमंडळ बैठक बोलावली असून, तिच्याकडे लक्ष लागले आहे.
Bhagwant Mann and Arvind Kejriwal, Bhagwant Mann News Updates, Arvind Kejriwal News, Punjab AAP News
Bhagwant Mann and Arvind Kejriwal, Bhagwant Mann News Updates, Arvind Kejriwal News, Punjab AAP NewsSarkarnama

चंडीगड : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP) सत्ता मिळली असून, मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी धूमधडाक्यात काम सुरू केले आहे. असे असले तरी आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मान यांना डावलून थेट पंजाबमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावरुन गदारोळ सुरू असताना आता मान यांनी या प्रकरणी मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून संकेत दिले आहेत. (Bhagwant Mann News Updates)

वीज महामंडळाची बैठक केजरीवाल यांनी घेतली होती. या बैठकीला मान अनुपस्थित होते. त्यानंतर तातडीने काल मान हे दिल्लीत जाऊन केजरीवाल यांना भेटले होते. यानंतर आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत मोठा निर्णय घेऊन जनतेला गुड न्यूज देण्याचे संकेत मान यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी आपने पंजाबमधील जनतेला ३०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Bhagwant Mann and Arvind Kejriwal, Bhagwant Mann News Updates, Arvind Kejriwal News, Punjab AAP News
केजरीवालांनी आपल्याच मुख्यमंत्र्यांना आणलं अडचणीत!

केजरीवाल यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या अनुपस्थितीत घेणे घटनाबाह्य असल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे. यामुळे मुख्यमंत्री मान अडचणीत आले आहेत. पंजाबमध्ये रिमोट कंट्रोल सरकार असल्याची ओरड विरोधकांनी सुरू केली आहे. सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत असल्याची टीका विरोधक करीत आहेत. आम आदमी पक्षाने पंजाबमधील जनतेचा विश्वासघात केला आहे, असा दावाही विरोधकांनी केला आहे.

Bhagwant Mann and Arvind Kejriwal, Bhagwant Mann News Updates, Arvind Kejriwal News, Punjab AAP News
चंद्रकांतदादांनी मला ऑफर दिली पण..; उत्तरसभेत वसंत मोरेंचा गौप्यस्फोट

याबाबत बोलताना काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते प्रतापसिंग बाजवा म्हणाले की, पंजाबचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना डावलून अशा प्रकारे केजरीवालांनी बैठक घेणं हे घटनाबाह्य आणि अस्वीकारार्ह आहे. दिल्लीतील रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या सरकारसाठी राज्यातील जनतेनं मतदान केलेलं नाही. केजरीवाल सर्व मंत्र्यांच्या अनुपस्थितीत बैठक घेणार आहेत, हे पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी आधी राज्यातील जनतेला कळवायला हवं होतं. राज्यातील जनतेच्या हक्कांचा हा भंग आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com