Rupali Chakankar on Asha Buchke Sarkarnama
पुणे

VIDEO आशा बुचके यांच्या आंदोलनाची रुपालीताईंनी हवाच काढली! अजितदादांना काळे झेंडे दाखवणं राजकीय स्टंट

Mangesh Mahale

अजित पवार हे घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत, सरकारी कार्यक्रमांना बोलवत नाहीत," असा आरोप करीत अजितदादांना (Ajit Pawar) काळे झेंडे दाखवणाऱ्या भाजपच्या माजी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशा बुचके यांच्या आंदोलनाची हवाच राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakanka)यांनी काढून टाकली.

हा पक्षाचा कार्यक्रम होता, याची जाणीव आशाताईंना (आशा बुचके)असेल, पण अशा प्रकारचे झेंडे दाखवण्यापेक्षा त्या दादांकडे जरी आल्या असत्या तरी दादांनी त्यांचे म्हणणं ऐकूण घेतलं असतं," असे चाकणकर म्हणाल्या. "दादांना काळे झेंडे दाखवणं ही त्यांची राजकीय स्टंटबाजी आहे," अशा शब्दात रुपालीताईंनी आशाताईंना (Asha Buchke) फटकारलं.

"आजची बैठक ही पक्षाची बैठक होती, बैठकीला काही अधिकारी उपस्थित होते. काही प्रश्न जागच्या जागी सोडवण्यासाठी अजितदादांनी अधिकाऱ्यांना बोलवले आले होते," असे स्पष्टीकरण चाकणकरांनी दिले. आजचा कार्यक्रम सरकारी कार्यक्रम नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. "राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या राज्यात जनसन्मान यात्रा सुरु आहे. यानिमित्ताने त्या परिसरातील जनता, आमदार यांची भेट घेऊन तेथील प्रश्न अजितदादा जाणून घेत आहेत, हे प्रश्न सोडविण्यात येत आहेत,असे त्या म्हणाल्या.

अजित पवार हे सगळ्यांच्या तक्रारी ऐकूण घेतात, प्रश्न सोडवतात, हे महाराष्ट्राला माहीत आहे. असे स्टंटबाजीचे प्रकार अधूनमधून होत असतात. त्याचे आम्हाला विशेष वाटत नाही. हा पक्षाचा दौरा आहे. प्रचार करणे, पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहचविणे हा पक्षाचा अधिकार आहे. अजितदादा पक्षाचे अध्यक्ष आहे, त्यामुळे आमदारांना भेटणं, त्यांच्या मतदारसंघातील समस्या सोडवणं हा त्यांचा अधिकार आहे,असे चाकणकर म्हणाल्या.

शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांचा दौरा सुरु आहे. जुन्नरमध्ये एक बैठक झाली. भाजप आणि शिवसेनेला बैठकीचे आमंत्रण नव्हते, त्यांचा राग मनात धरुन आशा बुचके आणि त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरुन अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले. सरकारी कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस डावलत असल्याचा आरोप करीत बुचके यांनी अजितदादांचा निषेध केला. अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT