भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता. मात्र भाजपाचं हे स्वप्न पूर्ण झालेलं नाही. ५४३ पैकी २९२ जागा या एनडीएला मिळाल्या आहेत. तर भाजपाला २४१ जागा मिळाल्या आहेत.
‘तीन’ हा आकडा संघ विचारधारा मानणाऱ्यांसाठी अशुभ असला तरी या तीन गोष्टी मोदी यांनी नक्कीच घडवून आणल्या असत्या अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या 'सामना'च्या 'रोखठोक'मधून खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
‘घर घर तिरंगा’ हे राजकीय अभियान मोदी सरकारने सुरू केले. त्या तिरंग्याच्या रक्षणासाठी आजही शेकडो जवानांचे बलिदान सुरूच आहे व दहा वर्षांच्या मोदी काळात तिरंगा जवानांच्या रक्ताने जास्तच भिजला. जम्मू-कश्मीरात रोज आतंकी हल्ले सुरू आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस अतिरेक्यांचा हल्ला झाला व त्यात दोन लष्करी अधिकारी ‘हुतात्मा’ झाले. हे सर्व वेदनादायी आहे आणि लाल किल्ल्यावरील भाषणात आपल्या पंतप्रधानांनी त्यावर एक शब्दही उच्चारला नाही, असे राऊतांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते. राहुल गांधी यांनी अदानी-माधवी बूच-हिंडनबर्ग घोटाळ्यावर प्रश्न विचारताच मोदी यांच्या सरकारने राहुल गांधी यांच्या मागे ‘ईडी’चा ससेमिरा पुन्हा लावला, पण माधवी बूच ‘सेबी’च्या प्रमुखपदी कायम आहेत.
आपल्या देशातील कायदा किती सडवला आहे त्याचे हे उत्तम उदाहरण. राज्यकर्त्यांचे हात बरबटलेले आहेत. ते आता इतके बरबटले आहेत की, देशाचे सर्व चित्रच त्यामुळे बरबटून गेले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
या तीन गोष्टी मोदी यांनी नक्कीच घडवून आणल्या असत्या व त्यासाठी तहहयात आपणच पंतप्रधान राहू हा ‘पुतीन पॅटर्न’ लागू करण्यासाठी संविधानातील लोकशाही, स्वातंत्र्यविषयक कलमे बदलायलाही त्यांनी पावले टाकली असती, पण भारतीय जनतेने हे होऊ दिले नाही, असा टोला राऊतांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे.
रोखठोकमध्ये म्हटलं आहे की....
78 व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी यांनी तरीही लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला, ज्या तिरंग्यास त्यांच्या मार्गदर्शक संघटनेचा विरोध होता. या वेळी मोदी यांनी 400 जागा खरोखरच जिंकल्या असत्या तर त्यांनी पुढील तीन गोष्टी नक्कीच घडवून आणल्या असत्या.
1) भारतीय चलनावर महात्मा गांधींऐवजी स्वत:चा फोटो टाकण्याची इच्छा पूर्ण करून घेतली असती.
2) संविधान त्यांनी नक्कीच बदलले असते.
3) ‘तिरंगा’ बदलण्याचे मनसुबेही तडीस नेले असते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.