Pune News: लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फारसे यश मिळालेलं नाही. त्यामुळे अनेक नेते पदाधिकारी इतर पक्षांमध्ये उड्या मारू शकतात, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पुण्यातील डॅशिंग महिला नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre) यांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली होती. मात्र ती ऑफर रूपाली ठोंबरे पाटील यांनी ती धुडकावली.
लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एका जागेवरच समाधान मानावे लागले तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने तब्बल आठ जागा जिंकल्या. यामुळे यानंतर शरद पवार पक्षातील नेत्यांकडून अजित पवार गटातील आमदार आणि नेते आपल्या संपर्कात असल्याचे विधान समोर येत आहे. यामुळे नेमके कोणते नेते आता अजित पवारांना सोडून पुन्हा एकदा शरद पवारांच्या सोबत जाणार याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अशातच आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट करत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिला आहे. या पोस्टमध्ये सुषमा अंधारे म्हणाल्या, निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क, निडरता, रोखठोक, नेत्यांच्या मागेपुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणारी लढाऊ कार्यकर्ता..तरीही अजून किती दिवस उपेक्षित राहणार?
रूपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ असे आवाहन त्यांनी केली होते. यावर आता रूपाली ठोंबरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठोंबर पाटील म्हणल्या, राजकारणात सुषमा अंधारे माझ्या मैत्रीण आहे. मी अजित पवार यांच्यासोबत काम करणार.
सुषमा अंधारे यांना राष्ट्रवादीबाबत ज्या काही गोष्टी वाटल्या त्या त्यांनी बोलून दाखवल्या. त्यांनी ऑफर दिल्याबद्दल मी आभारी आहे. येणाऱ्या काळात अजित पवार यांच्यासोबतच मी काम करणार आहे. माझी मुस्कटदाबी होते असेल तर मी सामोरं येऊन नक्की सांगेन. पुढील काळात अजितदादांच्या नेतृत्वाखाली जबाबदारी भेटेल आणि चांगले काम करून दाखवू. सुषमा अंधारेची ऑफर मी सध्यातरी स्वीकारली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.