Video Manoj Jarange Update : 'बजरंग बाप्पा'चे 'किंगमेकर' मनोज जरांगेच; बीडमध्ये झळकले बॅनर

Beed MP Bajrang Sonawane Victory Manoj Jarange Factor: बजरंग सोनवणे यांच्यासह या बॅनरवर आमदार संदीप क्षीरसागर यांचा देखील फोटो आहे. हे बॅनर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्ह्याचे उपाध्यक्ष झुंजार धांडे यांनी लावले आहे.
Beed MP Bajrang Sonawane Victory Manoj Jarange Factor
Beed MP Bajrang Sonawane Victory Manoj Jarange FactorSarkarnama

विनोद जिरे

भाजपच्या फायरब्रँड नेत्या पंकजा मुंडे यांना पराभवाची धुळ चारणाऱ्या बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी आपला विजय 'मनोज जरांगे फॅक्टर'मुळे झाला असल्याचे सांगितले होते. सोनवणेंच्या विजयाचे श्रेय मनोज जरांगे यांना देण्यास आता सुरवात झाली आहे. 'बजरंग बाप्पा'चे 'किंगमेकर' हे मनोज जरांगेच असल्याचे बॅनर बीडमध्ये झळकले आहे.

मनोज जरांगे यांचा आणि त्यांच्या मराठा आंदोलनाचा महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत फायदा झाल्याची चर्चा होत असताना आता बीडमध्ये (Beed) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या अभिनंदनाच्या बॅनरवर जरांगे पाटलांचा फोटो झळकला आहे.

बॅनरवर जरांगेंचा मोठा फोटो असून त्या बाजूला 'किंगमेकर'असा उल्लेख करण्यात आला आहे. हे बॅनर बीडकरांचे लक्ष वेधून घेत आहे. बजरंग सोनवणे यांच्यासह या बॅनरवर आमदार संदीप क्षीरसागर यांचा देखील फोटो आहे. हे बॅनर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्ह्याचे उपाध्यक्ष झुंजार धांडे यांनी लावले आहे. बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे बॅनर लावले आहे.

Beed MP Bajrang Sonawane Victory Manoj Jarange Factor
Raj Thackeray: बिनशर्त पाठिंबा देऊनही मनसेच्या वाट्याला अवहेलनाच!

बीड लोकसभा मतादरसंघातील पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे ही लढत चुरशीची झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंडे यांच्यासाठी मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या होत्या. सोनवणे यांच्यासाठी देखील शरद पवारांनी ताकद लावली होती.

मराठवाड्यातील मराठा आंदोलनाचा थेट फटका बीड, जालना,नांदेड, परभणी या मतदारसंघाना बसल्याचे बोलले जाते. निवडणुकीत बीडमध्ये ओबीसी आणि मराठा मतांचे ध्रुवीकरण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सोनवणेंच्या विजयात महाविकास आघाडीच्या ताकदीसह जरांगे फॅक्टरही लागू होतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com