Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत नेत्यांची खलबतं झाली. भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून या रिक्त पदावर कोणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती.
अखेर या महत्त्वाच्या पदासाठी पुण्यातीलच वैशाली नागवडे यांच्या नावावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, या पदासाठी पुण्यातूनच राष्ट्रवादीच्या फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यादेखील प्रचंड इच्छुक होत्या. मात्र, पक्षाने ठोंबरेंना डावलत नागवडे यांच्यावर जबाबदारी सोपवल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस मधील विविध विषयावर काल एक बैठक झाली.या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे उपस्थित होते.
पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. महिला प्रदेशाध्यक्ष आणि युवक अध्यक्षपदासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे या बैठकीत ठरले. त्यानुसार महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे, तर युवक अध्यक्षपदी निखिल ठाकरे यांच्या नावांची निश्चिती झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, विद्यार्थी अध्यक्षपदी आकाश झांबरे आणि युवती अध्यक्ष पदावर सध्या कार्यरत असलेल्यांनाच पुन्हा संधी दिली जाणार आहे.
कोण आहेत वैशाली नागवडे?
रुपाली चाकणकर यांच्यानंतर महिला प्रदेशाध्यक्षपद पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यालाच मिळणार हे आता स्पष्ट झाले आहे. वैशाली नागवडे या सध्या पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून काम पाहत असून, त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्षपद आणि प्रदेश सरचिटणीसपद भूषवले आहे. पुणे जिल्ह्यातील आणि विशेषतः दौंड तालुक्यातील एक सक्रिय आणि आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी २०१७ आणि २०२० च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राहू-खामगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.