Pune News : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अध्यक्ष आणि सभापती निवडीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य शासनाने याबाबतचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांकडून या निवडी बाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.
पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे या ठिकाणी अध्यक्षपदाची माळ कोणत्या तालुक्याच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्याच बरोबर पुणे जिल्ह्यातील अनेक पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. या ठिकाणी देखील सभापती पदाची निवड करण्यात येणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे.
या निवडी संदर्भात आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये बैठकीच्या आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, मुंबईतील एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी त्यांना तातडीने मुंबईला रवाना व्हावे लागले. त्यामुळे त्यांना बैठकीला उपस्थित राहता आले नाही.
त्यांच्या अनुपस्थितीमध्ये पुणे जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीला मंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार सुनील शेळके, आमदार शंकर मांडेकर हे बैठकीला उपस्थित होते.
बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले. काही नावे गटनेते पदासाठी चर्चेत होती. परंतु गटनेता 6 तारखेला निश्चित केला जाणार आहे. मात्र जो गटनेता असेल तोच जिल्हा परिषद अध्यक्ष असेल असे नाही, गटनेता निवडल्यानंतर इतर दुसरा व्यक्ती देखील जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊ शकतो असे, या बैठकीमध्ये नमूद करण्यात आले. तसेच सुनेत्रा पवार याच यावर फायनल निर्णय घेणार असल्याचे देखील सांगण्यात आले.
त्यानुसार आजच्या बैठकीत गट नेते पदासाठी काही नाव निश्चित करण्यात आली आहे. 6 तारखेला पुणे जिल्हा बँकेत होणाऱ्या बैठकीत एक नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र या सर्व प्रक्रियेमध्ये तसेच आगामी काळात होणार्या निवडी आपल्या पक्षाच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या करणार आहेत. आम्ही ढवळाढवळ करणार नाही, असे या बैठकीदरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.