ZP Election : उमेदवारांनो...ZP, पंचायत समितीला किती खर्च केला? 10 मार्चपर्यंत माहिती द्या; अन्यथा 6 वर्षे निवडणुकीस मुकाल!

Candidates Expenses : सोलापूर जिल्ह्यात झेडपी व पंचायत समिती निवडणुकीनंतर उमेदवारांना 30 दिवसांत खर्च अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. 09 फेब्रुवारी निकालानंतर 10 मार्च ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
ZP Election
ZP ElectionSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 01 March : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये कोणत्या उमेदवाराने किती खर्च केला?, याची माहिती निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आतमध्ये निवडणूक प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या निवडणूक खर्चाची माहिती देण्याची आणि घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल 09 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला आहे. त्यामुळे 30 दिवसांच्या आत म्हणजे 10 मार्चपर्यंत उमेदवारांना खर्च सादर करावा लागणार आहे.

जिल्हा परिषद (zilla Parishad) आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील उमेदवारांनी दिलेली खर्चाची माहिती पडताळण्यासाठी व खर्च माहिती स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त आणि लेखाधिकारी मीनाक्षी वाकडे-ठोके यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे हे उमेदवार खर्चाचा तपशील सादर करत आहेत.

सोलापूर (Solapur) जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या ६८ असल्याने जिल्हा परिषद सदस्यांना निवडणुकीत खर्चासाठीची मर्यादा ७ लाख ५० हजार रुपये एवढी देण्यात आलेली होती, तर पंचायत समिती सदस्यांसाठी ५ लाख २५ हजार एवढी खर्च मर्यादा होती. उमेदवारांनी या मर्यादेतच खर्च केला आहे, याची माहिती आयोगाला सादर करावी लागते.

निवडणुकीत केलेल्या खर्चाची माहिती न देणाऱ्या उमेदवारांवर कडक कारवाई केली जाते. खर्च सादर न केलेला उमेदवार विजयी झालेला असेल तर त्याला अपात्र ठरवून पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घातली जाते. उमेदवार पराभूत असेल तर त्याला पुढील सहा वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घातली जाते.

ZP Election
Ali Khamenei Death : मुलीला मारलं, जावयालाही मारलं… आता खामेनेईंच्या संपत्तीचा वारसदार कोण? एकूण नेटवर्थ किती?

सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ गटांमध्ये २७१ उमेदवारांनी निवडणूक लढविली. त्यापैकी ८४ उमेदवारांनी आतापर्यंत खर्च सादर केला आहे. जिल्ह्यातील ११ तालुका पंचायत समित्यांमध्ये १३६ गण आहेत, त्या गणांतून ४८४ उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. त्यापैकी १२७ उमेदवारांनी आतापर्यंत खर्च सादर केला आहे.

ZP Election
Malegaon President Election : माळेगाव कारखाना अध्यक्षपदाची निवडणूक तहकूब, नेमकं कारण काय? सुनेत्रा पवारांची निवड लांबणीवर!

ग्रामपंचायत निवडणुकीत अडचण नको; म्हणून...

सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ६५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीला पराभूत झालेले अनेक उमेदवार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उभा राहण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत अडचणी येऊ नयेत; म्हणून अनेक उमेदवारांनी आतापासूनच काळजी घेण्यास सुरवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com