NCP MLA Disqualification Case Result  Sarkarnama
पुणे

NCP Crisis News : 90 टक्के राष्ट्रवादी अजितदादांसोबत, आव्हान दिलेच कशाला? आमदारांनी व्यक्त केल्या भावना!

NCP MLA Disqualification Case Result : "शिवसेनेच्या एकनाथ शिंदेना जसा न्याय मिळाला, तसाच बहूमताच्या आधारे अजितदादांनाही तो मिळाला..."

Uttam Kute

Pimpri Chinchwad News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या निवडणूक आय़ोगाच्या निकालावर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज गुरुवारी (ता.१५) शिक्कामोर्तब केले. तसेच त्यांचे सर्व आमदारही पात्र ठरवले. त्याचे दणदणीत स्वागत पुणे जिल्ह्यातील अजितदादांच्या दोन कट्टर समर्थक आमदार अण्णांनी केले. (Latest Marathi News)

पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे हे केवळ अजित पवारांच्या 2023 नाही, तर 2019 च्या बंडातही त्यांच्यासोबत अखेरपर्यंत होते. गतवेळी 2019 ला त्यांच्याऐवजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांना पक्षाने उमेदवारी दिली. अजित पवारांनी ती शेवटच्या क्षणी फिरवून बनसोडेंना दिली होती. त्यांनी आजचा निकाल हा योग्य आणि बरोबर असून तो आदराने स्वीकारत असल्याचे सांगितले. त्यामुळे अजितदादांचे नेतृत्व मान्यच झाले नाही, तर त्याला बळकटीही मिळाली, त्यांचे नेतृत्व पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना मान्य आहे, यावरही त्यातून शिक्कामोर्तब झाले, असे बनसोडे सरकारनामाला प्रतिक्रिया दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेच्या एकनाथ शिंदेना (Eknath Shinde) जसा न्याय मिळाला, तसाच बहूमताच्या आधारे अजितदादांनाही तो मिळाला,अशी प्रतिक्रिया त्यांच्या पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली. या निकालाचा फायदा होणार असून नवे लोक पक्षाशी जोडले जातील, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी फुटल्यानंतर गव्हाणेंसह उद्योगनगरीतील बहूतांश पक्ष,पदाधिकारी,कार्यकर्ते हे अजितदादांबरोबरच राहिले होते व आहेत.

गेल्यावर्षी 2 जुलैला राष्ट्रवादी फुटल्यानंतर बहूतांश म्हणजे 90 टक्के पक्ष हा अजितदादांबरोबर गेला होता.त्यामुळे त्याला खरं,तर आव्हान देण्याची गरजच नव्हती,असे मत अजितदादांचे पुणे जिल्ह्यातील दुसरे कट्टर समर्थक खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील तथा अण्णा यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर दिले.त्यावर समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे शिवसेनेबाबत (Shiv Sena) निकाल आल्यानंतर बहूमताच्या आधारे राष्ट्रवादीच्या संदर्भातही तो अपेक्षितच होता, त्यावेळी ध्यानात घ्यायला हवे होते,असे ते म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT