Nilesh Lanke News
Nilesh Lanke News  Sarkarnama
पुणे

Nilesh Lanke News : राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंनी उपसलं उपोषणाचं अस्र! शिंदे सरकारवर केले 'हे' गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो

Pune News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेले विकासकामांना शिंदे फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून अधिवेशन काळात सरकारला घेरण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी देखील सरकार व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत उपोषणाचं अस्त्र उपसलं आहे.

पुण्यातील पाटबंधारे कार्यालयाबाहेर आमदार निलेश लंके(Nilesh Lanke) हे उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी जोपर्यंत मंजूर विकासकामांची निविदा निघत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

लंके म्हणाले, माझ्या नगर पारनेर मतदारसंघातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात २९ कोटींची बंधारे मंजूर करण्यात आले. त्यामुळे बराचसा भाग ओलिताखाली आला असता. ९ मे २०२२ रोजी त्या मंजूर झालेल्या बंधाऱ्यांच्या कामांसाठी अनेकवेळा पाठपुरावा करुनही अद्यापपर्यंत त्यासंबंधीच्या निविदा निघालेली नाही. त्या संदर्भात अनेकदा पाठपुरावा करुनही संबंधित जलसंधारण व पाटबंधारे विभागाकडून त्याला निर्णय दिलेला नाही असं लंके म्हणाले.

विकासकामांना ही कामे कुणी अडवली यावर भाष्य करताना निलेश लंके म्हणाले, ही कामे कुणी अडवली हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. ते सगळ्यांना माहिती आहे. राज्यात सरकार बदलल्यानंतर मंजूर विकासकामांबाबत कोणतीच प्रक्रिया होत नाही. याविषयी मी स्वत: तर पाठपुरावा केलाच शिवाय राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना वेगानं कामं मार्गी लावण्यासंदर्भात सूचना करुनही तरीपण जाड कातड्याचं सरकार, अधिकारी यांच्यामुळे ती कामे अद्यापही रखडलेलीच आहे असा आरोपही लंके यांनी यावेळी केला.

मला कुणाचं नाव घ्यायचं नाही. फक्त माझ्या मतदारसंघातील शेतकर्यांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी हा लढा उभारला आहे. आणि जोपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या पाटबंधारे विकासकामांची निविदा निघत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशाराही आमदार निलेश लंके यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT