rohit pawar, bhagat singh koshyari
rohit pawar, bhagat singh koshyari sarkarnama
पुणे

Rohit Pawar : 'राज्यपालांचा ७० वर्षातील इतिहासही कच्चा,' असं रोहित पवार का म्हणाले ?

सरकारनामा ब्युरो

पुणे : आपल्या विधानामुळे वाद ओढवून घेणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत असेच विधान केलं आहे. या विधानवरुन सोशल मीडियात राज्यपालांवर टीका होत आहे. यावर राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टि्वट करुन राज्यपालांना चिमटा काढला आहे. (bhagat singh koshyari news update)

राज्यपालांच्या विधानावर रोहित पवारांनी निशाणा साधला आहे. "नरेंद्र मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती. नरेंद्र मोदींच्या जादूमुळे जगात भारतीयांचा गौरव वाढला," असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नागपूर येथे नुकतेच केलं होत.

राज्यपाल म्हणाले होते की "देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांचाही काळ मी पाहिला आहे. मात्र, पहिल्यांदा देशासाठी वीस तास काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जादूमुळे जगात भारताचा गौरव वाढला आहे. मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती. आमच्या प्रथा, परंपरांना लोक नावं ठेवायची,"

"राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. नरेंद्र मोदी हे मोठे नेते असून, देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही." असे टि्वट रोहित पवारांनी केले आहे.

"आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे आणि त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान असतं असं नाही, तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरिकांचं योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून 'आधी भारतीयांना किंमत नव्हती' असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीनं करणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे", अशी टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर रोहित पवार यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT