Aurangabad Gram Panchayat : बंडखोरीनंतरही भुमरे यांचा करिष्मा कायम

Aurangabad Gram Panchayat | पैठण तालुक्यातील 7 पैकी 6 ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. भुमरे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.
Sandipan Bhumare
Sandipan BhumareSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडखोरीला जिल्ह्यातील सात पैकी पाच आमदारांनी आपले बळ दिले होते. यात प्रामुख्याने माजीमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre), अब्दुल सत्तार यांची महत्त्वाची भूमिका होती. (aurangabad gram panchayat news update)

बंडखोरीनंतर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यात बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करत गद्दारांनो हिम्मत असेल तर राजीनामे देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवा असे,आव्हान दिले होते.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसादही मिळाला होता. त्यामुळे बंडखोरांच्या मतदारसंघातील पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काय निकाल लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र कुणी पाच वेळा तर कुणी तीन वेळा मतदार संघातून निवडून आलेले असल्यामुळे स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मतदारांनी आपल्या नेत्यांवर पुन्हा विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sandipan Bhumare
Aurangabad : बंडखोरीनंतरही ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे सत्तार, सिरसाट, भुमरेंचे वर्चस्व कायम

संदिपान भुमरे हे पैठण मतदारसंघातून पाच वेळा निवडून आलेले आहेत. ग्रामपंचायत पासून जिल्ह्यातील नगरपंचायती, नगरपरिषदा,स्थानिक स्वराज्य संस्था व सहकार क्षेत्रात देखील भुमरे यांचा वरचष्मा कायम राहिलेला आहे. पैठण मतदार संघाचा इतिहास पाहिला तर पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना या मतदारसंघातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. परंतु भुमरे यांना मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने भरभरून यश दिले आहे. सात पैकी सहा ग्रामपंचायत ताब्यात घेत भुमरे यांनी पैठणमध्ये आपलाच शिक्का चालतो हे दाखवून दिले.

पैठण तालुक्यातील 7 पैकी 6 ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. भुमरे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अगरनांदर, गावंतांडा या ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत. पैठण तालुक्यात शिंदे गटाला मोठे यश मिळाले आहे. मतदार संघातील या विजयामुळे भुमरे यांचे बळ आता अधिक वाढले आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकी एक हाती विजय मिळवत सत्तासूत्र आपल्या हाती राखण्याकडे त्यांच्या कल असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com