MLA Rohit Pawar Sarkarnama
पुणे

Rohit Pawar Question to Rebels: तुमच्या भाजपविरोधी भूमिकेचं काय झाले? ; रोहित पवारांचा बंडखोरांना सवाल

सरकारनामा ब्यूरो

Pune Political News: कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीतील बंडखोरांवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. ८ ) नाशिक जिल्ह्यातील येवल्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुनर्बांधणीला सुरुवात केली. त्यानंतर आज (सोमवारी) आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

"भाजपनं आमच्यात भांडणं लावली आहेत. आम्ही भांडतोय भाजप एसीत बघून मज्जा बघतयं. जे चाललं हे योग्य आहे की नाही, हे जनता पाहत आहेत. हे फोडाफोडीचं राजकारण जनतेला पटलेलं नाही. तात्पुरती सत्ता मिळावी, म्हणून त्यांनी विचारसरणी सोडली," अशी टीका राष्ट्रवादीतील बंडखोरांवर रोहित पवारांनी केली आहे.

शरद पवार यांच्यासोबत राहून तुम्हाला पवार कळले नाही का? तुमच्या भाजपविरोधी भूमिकेचं काय झाले? असे म्हणत त्यांनी भाजपवर देखील टीका केली आहे. अजित पवार गटातील दिलीप वळसे पाटील आणि रोहित पवार या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

काल दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil)यांचे आंबेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर झालेल्या मेळाव्यात वळसे-पाटलांनी रोहित पवारांवर टीका केली. त्याला आज (सोमवारी) रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. रोहित पवार पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

"माझ्या अनुभवाएवढं त्यांचं वय नाही, रोहित पवारांमुळं साहेबांची साथ सोडली, असं म्हणत दिलीप वळसे-पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. त्यावर रोहित पवार म्हणाले, "साहेबांसोबत राहून काहींना साहेब कळलेच नाही. वळसे-पाटील पवार साहेबासोबत ४० वर्ष सोबत होते,पण त्यांना पवारांची भूमिका कळली नाही. वळसेंच्या वयाचा मान ठेवून काही गोष्टी बोलणार नाही,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT