Rohit Pawar VS Ram Shinde Sarkarnama
पुणे

Rohit Pawar News : भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का बदलला? रोहित पवारांचे विरोधकांना खोचक उत्तर; म्हणाले, 'मोदी-शाहांसोबत बैठक...

Rohit Pawar Reply Sunil Shelke : शेळके आणि राम शिंदेंच्या आरोपांना रोहित यांनी खोचकपणे उत्तर दिले आहे.

Mangesh Mahale

Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटांतील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दोन दिवसांपासून शरद पवार गटातील नेते, आमदार रोहित पवार यांना विरोधकांनी टार्गेट केलं आहे. 'रोहित पवार हे भाजपमध्ये जाणार होते,' असा गंभीर आरोप आमदार सुनील शेळके आणि राम शिंदेंनी केला आहे. या आरोपाला रोहित यांनी उपाहासात्मक उत्तर दिले आहे.

सुनील शेळकेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याआधीच रोहित पवार भाजपत जाण्याच्या तयारीत होते, असा गौप्यस्फोट शुक्रवारी केला. यानंतर भाजप आमदार राम शिंदे यांनीही त्यास दुजोरा देत शनिवारी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.

'रोहित पवारांनी २०१७ मध्ये राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेच्या तिकिटासाठी भाजपत जाण्याची धमकी दिली. त्यानंतर २०१९ मध्ये भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटून हडपसर आणि शिवाजीनगर विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी गेले होते,' असा गौप्यस्फोट करून राम शिंदेंनी शनिवारी खळबळ उडवून दिली.

भाजप हा हेकेखोर, दडपशाही करणाऱ्यांचा पक्ष...

शेळके आणि राम शिंदेंच्या आरोपांना रोहित यांनी खोचकपणे उत्तर दिले आहे. "मी भाजपमध्ये जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बारा वेळा बैठक घेतली. अमित शाह यांच्यासोबत तीस वेळा बैठका घेतल्या. इतकेच नाही तर मी बराक ओबामा यांच्यासोबतही बैठक घेत होतो, शेवटी मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत तीनदा बैठक घेतली. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की, भाजप हा पक्ष हेकेखोर आणि दडपशाही करणाऱ्यांचा पक्ष असल्याने मी माझा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय बदलला," रोहित पवार हे चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

याचे उत्तर स्वतः अजितदादांनी द्यावं...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी मुंबई दौऱ्यावर होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थित असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, "याचे उत्तर स्वतः अजितदादांनी द्यावं. त्यांना महायुतीच्या सत्तेत डावलण्यात येते का, याविषयी मी काही बोलू शकणार नाही,"

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT