Sharad Pawar Meet Gautam Adani : शरद पवार-अदानी भेटीवर रोहित पवार म्हणाले, "देशाचा विकास कसा करता येईल याबाबत..."

NCP News : उद्योगपती अंबानी, अदानींसह छोट्या व्यावसायिकांना शरद पवार हे भेटत असतात.
Sharad Pawar, Gautam Adani
Sharad Pawar, Gautam Adani Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अहमदाबाद येथे उद्योगपती गौतम अदानी यांची भेट घेतली. अदानी यांच्या घरच्या खासगी कार्यक्रमासाठी शरद पवार गेल्याची माहिती आहे. शरद पवार-अदानी भेटीवर चर्चा होत असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

उद्योगपती अंबानी, अदानींसह छोट्या व्यावसायिकांना शरद पवार हे भेटत असतात. या सगळ्यांना भेटल्यानंतर आपल्याला राज्याचा आणि देशाचा विकास कसा करता येईल, याबाबत चर्चा होत असते. त्यावरून आपण ध्येयधोरणे ठरवीत असतो. सगळ्या घटकांना भेटल्याशिवाय पॉलिसी कधीही करता येत नाही," असे रोहित पवार म्हणाले.

Sharad Pawar, Gautam Adani
Rohit Pawar News : रोहित पवारांनी केलं शाहरुख खानचं कौतुक; म्हणाले, 'जवान'मध्ये लोकशाहीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न'

कल्याण येथे ते माध्यमांशी बोलत होते. केंद्रीय निवडणूक आयोगावर त्यांनी टीका केली. शिवसेना कुणाची यावर सध्या सुरू असलेल्या सुनावणीवर रोहित पवारांनी भाष्य केले. "निवडणूक आयोग हे भाजपच्या हातातले बाहुले आहे, असे माझे नागरिक म्हणून वैयक्तिक मत आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या निर्णयावर देशात खूप मोठा बदल होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी एका पक्षाची भूमिका घेण्यापेक्षा लोकशाहीचे भूमिका घेणे अपेक्षित आहे. पण मला असं वाटतं हा विषय कोर्टात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल," असे सांगितले.

बुलेट ट्रेनवर रोहित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली. "बुलेट ट्रेनवर दीड लाख कोटींचा खर्च होणार आहे. बुलेट ट्रेनचे तिकीट हे विमानाच्या तिकिटापेक्षा महाग आहे. त्यामुळे लोक विमानाने जाणे पसंत करतील. वंदे भारत ही ट्रेन बुलेट ट्रेनपेक्षा 20 ते 30 टक्के स्लो आहे. बुलेट ट्रेनच्या बारा स्थानकांपैकी फक्त चार स्थानक महाराष्ट्रात आहेत. त्यासाठी 50 टक्के खर्च कशासाठी करायचा," असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

Edited By : Mangesh Mahale

Sharad Pawar, Gautam Adani
Kolhapur BJP News : भाजपमध्ये पदाधिकारी निवडीवरून वादाची ठिणगी; कोल्हापुरात बावनकुळे पॅचअपसाठी येणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com