Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Amol Kolhe Tweet : अमोल कोल्हेंची काल अजितदादांच्या शपथविधीला हजेरी; अन् आज म्हणतात मी शरद पवारांसोबत...

सरकारनामा ब्यूरो

NCP News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह एकूण नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते. मात्र, आता खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करत आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं जाहीर केलं आहे.

अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत आपली भूमिका जाहीर केली आहे. "जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है… पर दिल कभी नहीं। #मी_साहेबांसोबत", असं अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अमोल कोल्हे यांनी काही तासांतच आपली भूमिका बदलत शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. याबरोबरच खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील एक व्हिडिओ देखील ट्वीट केला आहे. 'सगळं विसरायचं, पण बापाला नाही विसरायचं. त्याला भेटल्याने, जवळ बसल्याने, मायेने विचारपूस केल्याने कणसाळतो, भारतो. त्याला नाही विसरायचं', असं या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट ही माहिती दिल्यानंतर आता ते लवकरच शरद पवार यांची भेट घेणार आहेत. तसेच शरद पवारांना भेटून माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं देखील खासदार कोल्हे यांनी सांगितलं आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT