Rahul Jagtap News: श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप कुणाबरोबर? त्यांनी स्वत:च भूमिका केली जाहीर

Ajit Pawar Joins Shivsena-BJP Government : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली.
Rahul Jagtap
Rahul JagtapSarkarnama

Ahmednagar News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह एकूण नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही फूट पडली आहे.

अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. तर आता महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे देखील आपली भूमिका स्पष्ट करून आपण नेमकी कुणाबरोबर आहोत, हे सांगताना दिसून येत आहे. आता श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांनीही आपली भूमिका जाहीर केली आहे.

Rahul Jagtap
Rahul Narvekar-MLA Disqualification : राष्ट्रवादीची आमदारांना अपात्रत करण्याची मागणी; राहुल नार्वेकर म्हणाले...

आपण शरद पवार यांच्यासोबत आहोत, अशी भूमिका माजी आमदार राहुल जगताप यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील राजकीय पेच संपुष्टात आला आहे. राष्ट्रवादीत अंतर्गत झालेल्या घडामोडीनंतर राहुल जगताप काय भूमिका घेणार याची उत्सुकता होती. ते अजित पवार यांच्याशी यापूर्वीच जवळ होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.

माजी आमदार राहुल जगताप यांनी आगामी विधानसभेची तयारी जोरात चालविली असून पक्षाचे ते संभाव्य उमेदवार समजले जातात. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घडविलेला राजकीय भूकंपांचे हादरे सगळीकडेच बसले. श्रीगोंद्यात सध्या भाजप नेते बबनराव पाचपुते आमदार आहेत.

Rahul Jagtap
Raj Thackeray On NCP Crisis : शरद पवारांच्या भूमिकेबाबत राज ठाकरेंना शंका; म्हणाले, "केंद्रात सुप्रिया सुळे मंत्री..."

आता अजितदादा व भाजप एकत्र आल्याने पाचपुते व जगताप एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू होती. मात्र, आता राहुल जगताप यांनी ते शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे राजकीय कुतुहल संपले आहे. पाचपुते व जगताप विरोधकच राहणार हे आता स्पष्ट झाले आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com