Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Amol Kolhe : ''...त्यामुळे मी पण उपमुख्यमंत्री होऊ शकेन!''; खासदार कोल्हेंच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

Political News : खासदार डॉ. अमोल कोल्हे अमृता खानविलकर बरोबर लग्न करणार?

सरकारनामा ब्यूरो

Amol Kolhe Social Media Viral : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे हे कायमच चर्चेत असतात. कोल्हे यांचा मोठा चाहता वर्ग असून ते सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतात. सध्या त्यांची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.

खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनी एका वृत्तपत्रामधील फेक बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्या पोस्टमध्ये अमोल कोल्हे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांचं लवकरच लग्न होणार आहे असं त्या बातमीमध्ये लिहिलं आहे. यावर अमोल कोल्हे यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. या बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कोल्हे यांनी 'हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

'' ...त्यामुळे मी पण उपमुख्यमंत्री होऊ शकेन!''

"राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधील फेक बातमीत कोल्हे हे सध्याच्या बायकोला कंटाळले आहेत. 'वाजले की बारा' फेम अमृता खानविलकर हिच्या प्रेमात ते पागल झाले आहेत. लवकरच ते पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन व अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट देऊन दोघे विवाहबध्द होणार असल्याचे चित्रपटक्षेत्रात बोलले जात आहे असाही उल्लेख केला आहे.

'' अमृता हे नावच लकी आहे राजकारण्यांना...''

'या विवाहाचा माझ्या राजकीय कारकीर्दीवर काहीही परिणाम होणार नाही. उलट अमृताशी लग्न केल्यामुळे मी पण उपमुख्यमंत्री होऊ शकेन कारण अमृता हे नावच लकी आहे राजकारण्यांना' असे ते म्हणाले" अशी ही बातमी आहे.

...नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची...

अमोल कोल्हे यांच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. कोल्हे पोस्टमध्ये म्हणतात, 'हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब बायकोला आज 1 एप्रिल आहे हे माहित होतं, नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती!' असा टोलाही कोल्हे यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT