Karnataka : चार वेळा आमदार असलेल्या रामास्वामींनी हाती घेतले कमळ ; 'जेडीएस'च्या बालेकिल्ल्याला खिंडार

Karnataka Assembly Election 2023 : अरकलगुड विधानसभा मतदार संघ हा माजी पंतप्रधान एच.डी देवेगौडा यांचा बालेकिल्ला आहे.
AT Ramaswamy
AT RamaswamySarkarnama
Published on
Updated on

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकच्या अरकलगुड विधानसभेचे आमदार एटी रामास्वामी (AT Ramaswamy) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांच्या उपस्थित भाजपची सदस्यता स्वीकारली. कर्नाटक विधानसभा निवडणुक प्रक्रिया सुरु असताना जेडीएस हा मोठा धक्का आहे.

रामास्वामी यांनी जनता दल (सेक्यूलर)मधून निवडून आले आहे. त्यांची नुकताच राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या निवासस्थानी नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर जेपी नड्डा यांनी टि्वट केले आहे.

"रामास्वामी यांचा भाजपमध्ये प्रवेश म्हणजे आमच्या विचारधारेचे समर्थन करण्याचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या अनुभव भाजपला उपयुक्त ठरेल, " असे टि्वट त्यांनी केले आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रामास्वामी म्हणाले की, भाजपची काम करण्याची पद्धत मला खूप आवडते. कुठलीही अपेक्षा न ठेवता मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जनतेची सेवा करण्याची मला संधी मिळावी म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अरकलगुड विधानसभा मतदार संघ हा माजी पंतप्रधान एच.डी देवेगौडा यांचा बालेकिल्ला आहे. त्याला खिंडार पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे.

AT Ramaswamy
Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभेचे बिगुल वाजलं ; हात चालणार की कमळ फुलणार ? ; निकाल..

कर्नाटकमध्ये विधानसभेची १० मे रोजी निवडणूक होत आहे. आतापर्यंत ९ कोटी ५९ लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. काही वस्तुही जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती शनिवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. मद्य, विविध वस्तू, रोख रक्कम आदी जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत १७२ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

AT Ramaswamy
Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजांनी पुन्हा तोडले अकलेचे तारे ; म्हणाले,'गांधींबाबत गोडसेंनी योग्यच ..'

कर्नाटक विधानसाठी एकूण 224 जागांसाठी निवडणूक होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीरही केली आहे. त्यामुळे कर्नाटकातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांची मोर्चेबांधणी अनेक महिन्यांपासून सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com