Supriya Sule News : आसाम सरकारने प्रसिध्द केलेल्या एका जाहिरातीत पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. आता राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे.
महाशिवरात्री शनिवारी (दि.१८) साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र भक्तिमय वातावरण असतानाच आसाम सरकारकडून भीमाशंकर ज्योतिर्लिंग(Bhimashankar) हे आसाममध्ये असल्याचा दावा ठोकल्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली. आसाम सरकारनं महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर एक जाहिरात प्रसिद्ध केली असून ६ वे ज्योतिर्लिंग कामरुप डाकिनी पर्वत आसाममध्ये आपलं स्वागत करत आहे अशा आशयाची ही जाहिरात आहे. या जाहिरातीत ज्योतिर्लिंगाच्या नावापुढे डाकिनीमधील भीमाशंकर असा उल्लेख आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा(Hemant Biswa) यांचे फोटोही जाहिरातीत आहेत.
याच मुद्दयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी या टि्वटद्व्रारे टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृपया महाराष्ट्राचा सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा जपण्यासाठी याची तातडीने दखल घ्यावी. या विषयाबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती कळवून आपली हरकत नोंदवावी असंही सुळे म्हणाल्या आहेत.
सुळे यांच्या टि्वटमध्ये काय म्हणाल्या ?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, घटनाबाह्य ED सरकार-आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती.तिथं तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती.त्याचवेळी तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना?अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही अशी टीका सुळे यांनी केली आहे.
भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही, असंच ठरवलंय का? आधी राज्याच्या वाट्याचे उद्योग पळवले, रोजगार पळवले आणि आता चक्क सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा पळवण्याचा घाट घातलाय, असा हल्लाबोलही सुळे यांनी केला आहे.
भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातच...
सुप्रिया सुळे यांनी भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातच असल्याचं स्पष्ट करताना भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे.अन्य कोणतेही नाही असं विधान केलं आहे. यावेळी त्यांनी आद्य शंकराचार्यांचा बृहद स्तोत्र रत्नाकर ग्रंथाचा संदर्भ दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.