Prashant Jagtap Sarkarnama
पुणे

NCP News : कोनशिला तोडफोडप्रकरणी प्रशांत जगताप यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा

Chaitanya Machale

Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाच्या कोनशिलेची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह नऊ जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सात महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी केली. पक्षातील प्रमुख नेत्यांना बरोबर घेऊन अजित पवार यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे - फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. त्यानंतर शरद पवार यांच्याकडून पक्षाचे घड्याळ चिन्ह काढून घेत निवडणूक आयोगाने अजितदादा यांना हे चिन्ह दिले.

या घटनेच्या निषेधार्थ प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. शिवाजीनगर येथील पक्षाच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाची कोनशिला काही कार्यकर्त्यांनी हातोडीने फोडून टाकली. तसेच अजित पवार यांच्या विरोधात घोषणाही या वेळी देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणी अजित पवार गटाच्या लावण्या मुकुंद शिंदे (रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून प्रशांत जगताप यांच्यासह सुषमा सातपुते, अरबाज जमादार, प्रियंका सोनवणे, वंदना मोडक, प्रियंका खरात, अक्षता भिमाले, दीपाली कवडे, लखन वाघमारे या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना झाली होती, त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थीने हा वाद मिटविण्यात आला होता, परंतु आता या प्रकरणात अजित पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तक्रार पोलिसांकडे दाखल केल्याने, शरद पवार गटातील नऊ जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक सविता सपकाळे याबाबत पुढील तपास करत आहेत.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT