NCP Protest News Sarkarnama
पुणे

NCP Protest News: पुण्यातही 'आरे'सारखा मुद्दा पेटणार? झाडांच्या कत्तलीवरुन पालिकेविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Pune Municipal Corporation River improvement project : पुण्यात मुळा आणि मुठा नदीपात्रामध्ये नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली प्रचंड उलथापालथ सुरू...

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पुणे महानगरपालिकेने मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, या पुण्यातील होणारा नदीसुधार प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या ६००० झाडांची कत्तल थांबवा या मागणीसाठी आता पर्यावरण प्रेमींपाठोपाठ राजकीय पक्ष देखील आक्रमक झाले आहे. मनसेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही या झाडांंच्या कत्तल प्रकरणात उडी घेतली आहे. त्यामुळे मुंबईतील आरेसारखा पुण्यातील मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)कडून पुण्यात सोमवारी(दि.२७) रोजी सकाळी छत्रपती संभाजी उद्यानाबाहेर आंदोलन आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख झाडावर चढले.तसेच नदी बचाव, झाडांची कत्तल थांबवा अशी मागणी करणारे फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पुण्यात मुळा आणि मुठा नदीपात्रामध्ये नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली प्रचंड उलथापालथ सुरू आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भर टाकण्यात येत आहे. तर नदीपात्रातील ६००० झाडं तोडण्यात येत असल्याचा आरोप देखील केला जात आहेत.

नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली पुणे महापालिका प्रशासन सहा हजार झाडांची कत्तल करणार असेल तर हे निश्चितच पुणेकरांच्या दृष्टीने चांगलं चिन्हं नाही. जी झाडं तोडण्याचा प्रस्ताव आहे ती देशी झाडं असून अनेक पक्षांचा नैसर्गिक अधिवास आहे असा पावित्रा राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतला आहे. तसेच शहराचा विकासही व्हायला हवा व पर्यावरणाचे रक्षण ही व्हावे ह्या मागणीकरीता प्रशासनास व भाजपच्या राज्यातील सत्ताधाऱ्यांना जाग यावी यासाठी हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण ?

पुणे महापालिकेने नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत तब्बल पाच हजार कोटींचा मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या दोन टप्प्यांतील कामांसाठी तब्बल 6 हजारांहून अधिक वृक्षांवर कुर्‍हाड कोसळणार आहे. या प्रकल्पाच्या खोदाईत आणि बांधकामात अडथळा ठरणार्‍या 3 हजार 249 वृक्षांना पूर्णत: काढण्याचा, तर 2 हजार 813 वृक्ष काढून त्यांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानेच वृक्षसंवर्धन समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT