Rahul Gandhi News : खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले...

Modi surname defamation case : राहुल गांधींना सर्व समाजाचा आदर...
Rahul Gandhi News, Kirit Panwala
Rahul Gandhi News, Kirit Panwala Sarkarnama
Published on
Updated on

Congress News : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 'मोदी' आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून सुरत न्यायालयानं मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी घेतला आहे. यावरुन एकीकडे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राहुल गांधी यांच्या वकिलांनी धक्कादायक खुलासा केल्याचं समोर आलं आहे.

राहुल गांधीं(Rahul Gandhi)चे वकील किरीट पानवाला यांनी एका इंग्रजी न्यूज वेबसाईटला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी हा खुलासा केला आहे. पानवाला म्हणाले, आम्ही या मानहानीच्या खटल्यात दोनवेळा वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तक्रारदार तयार झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्यास माफी मागितली जाऊ शकते. परंतू, खालच्या न्यायालयात बदनामी झाल्यास परिस्थिती खूप वेगळी असते. गांधींना सर्व समाजाचा आदर आहे असे लेखी देण्यास आम्ही तयार होतो. पण तरीही तक्रारदार मान्य करायला तयार नव्हते.

Rahul Gandhi News, Kirit Panwala
Shirsat vs Andhare : संजय शिरसाटांची खालच्या पातळीवर टीका, अंधारेंचा संताप; म्हणाल्या,''स्वतःची वैचारिक...''

तसेच गांधी यांनी लेखी निवेदनही दिले. कदाचित, लिखित सबमिशन तोंडी सबमिशन विभागांतर्गत येत असल्याने निकालात त्याचा स्वतंत्रपणे उल्लेख केलेला नाही असेही वकील पानवाला म्हणाले.

निवडणुकीच्या रॅलीत नरेंद्र मोदींवर काही आरोप केले गेले आणि शेवटी एक वाक्य अकस्मात उच्चारले गेले. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी…सर्व चोरांचे एकच आडनाव मोदी कसं आहे? असं राहुल गांधी बोलून गेले.

...तर मोदींनी तक्रार दाखल करायला हवी होती!

या विशिष्ट प्रकरणात नरेंद्र मोदींनी तक्रार दाखल करायला हवी होती. कारण आणि त्याऐवजी आमच्याकडे पूर्णेश मोदींनी गुन्हा दाखल केला.कारण बदनामी टिप्पणीमध्ये करण्यात आलेल्या आरोपांपैकी 90 टक्के आरोप हे त्यांच्या विरोधात आहेत आणि कायद्यानुसार आरोप एखाद्या व्यक्तीवर असतील तर त्या व्यक्तीने पीडित पक्ष म्हणून तक्रार दाखल करावी असंही किरीट पानवाला (Kirit Panwala)यांनी सांगितले.

Rahul Gandhi News, Kirit Panwala
Uddhav Thackeray News: आपण एकत्र आलो , त्याला फाटे फुटू देऊ नका; राहुल गांधींना ठाकरे गटाचा पुन्हा इशारा

हा आरोप पूर्णपणे निराधार...

राहुल गांधींनी हे प्रकरण कधीच गांभीर्यानं घेतलं नाही हे खरं आहे का? यावरही पानवाला यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, हा आरोप पूर्णपणे निराधार आहे. कायदेशीर खटला अत्यंत गांभीर्याने घेतला गेला, कोणतीही सूट मागितली नव्हती. लोकांमध्ये आणि मीडियामध्येही त्यांची चुकीची प्रतिमा आहे. त्यांनी न्यायालयातील एकही सुनावणी चुकवली नाही. तसेच न्यायालयासह सर्वांचा त्यांना आदर असल्याचे पानवाला म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com