Ajit Pawar Power in Maharashtra Sarkarnama
पुणे

NCP Pune : स्वतःची उमेदवारी जाहीर करून गोंधळ घालू नका, अजितदादांच्या शिलेदारांनी टोचले कार्यकर्त्यांचे कान

NCP Pune Election Campaign : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आक्रमक मोहीम सुरू केली असून, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना पक्ष शिस्तीचा सल्ला दिला आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 18 Oct : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आक्रमक मोहीम सुरू केली असून, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना पक्ष शिस्तीचा सल्ला दिला आहे.

‘स्वतःची उमेदवारी स्वतः जाहीर करू नका; सर्वजण पक्षशक्ती वाढवण्यासाठी एकजुटीने झटावे,’ असा स्पष्ट संदेश वळसे पाटील यांनी शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील कार्यकर्ता मेळाव्यात दिला. मावळ तालुक्यात आमदार सुनील शेळके यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपला आव्हान देत, ‘जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू,’ अशी घोषणा केली होती.

त्यानंतर आता वळसे पाटील यांनीही रणशिंग फुंकले. मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, “सर्वजण पक्षशक्ती वाढविण्यासाठी कामाला लागा. स्वतःची उमेदवारी जाहीर करून गोंधळ घालू नका. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा विजय करायचा आहे.” केंद्र व राज्य सरकारे एकाच विचारधारेची असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी निधी आणण्याचे काम प्रामाणिकपणे करतील, असेही त्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांनी नकारात्मक बोलणे बंद करून जनसेवक म्हणून भूमिका बजावावी, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. मेळाव्यात उपस्थित असलेल्या आढळराव पाटील यांनी पक्षातील गट-तटांवरून उघड नाराजी व्यक्त केली. “निवडणुकीत निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी द्या. स्थानिक गावपातळीवरील गट-तट पक्षाला हानी पोहोचवतात.

सर्वजण एकजुटीने काम करावे,” असे ते म्हणाले. या मेळाव्यामुळे पक्षातील अंतर्गत कलहावर चाप बसवण्यासाठी हे नेते कामाला लागले असल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीने उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, राष्ट्रवादीचा थेट सामना मित्रपक्ष असलेल्या भाजपशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्ह्याचा आपला गड राखण्यासाठी मातब्बर नेत्यांना मैदानात उतरवलं असल्याचे पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT