Buldhana News, 18 Oct : भाजपचे बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी थेट शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता जळगाव पाठोपाठ बुलढाण्यात देखल महायुतीत फूट पडणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
आगामी स्थानिर स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा भाऊ कोण यावरून आता महायुतीत धुसफूस सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. ही चढाओढ सुरू असतानाच आता भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी थेट आमदार संजय गायकवाड यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.
शिवाय बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी भाजपचा विचार होत असेल तरच युती शक्य आहे, असंही विजय शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपने नगराध्यक्षपदावर प्रबळ दावा केल्याचं दिसत आहे. तर नगराध्यक्षपदावर दावा करतानाच शिंदेंनी गायकवाड यांच्यावर हल्लाबोल केला.
विजय शिंदे म्हणाले, बुलढाण्यात बेडकासारख भाषणातून युती पाहिजे असं म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीने काल दीड कोटी रुपयांची डिफेंडर आणली. ती एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर असून ती कोणत्या कामाच्या कमिशनमुळे मिळाली आहे, याची चौकशी झाली पाहिजे.
मतदारांना वेश्यांपेक्षा खराब म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीला लोक नाकारतील म्हणून भाजपचाच विचार व्हावा अन्यथा युती नाही, असं शिंदेंनी स्पष्ट केलं. दरम्यान, बुलढाण्यात शिवसेना-भाजप युती करण्याचा आमचा प्रयत्न असून युती होईल अशी आम्हाला आशा आहे.
मात्र, जेव्हा बैठक होईल आणि त्यांनी जर सांगितलं की तुम्ही तुमचं लढा आणि आम्ही आमचं लढू. तर आम्ही आमचं लढू. मात्र, बुलढाण्यात मोठा भाऊ मीच आहे, असं ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे आता बुलढाण्यात भाजप-सेनेची युती होणार की ते स्वबळावर निवडणुका लढवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.