Pune political news NCP corporators case 
पुणे

NCP News : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 नगरसेवकांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा, अभ्यासिकेमध्ये घुसले अन्...

Pune NCP corporators atrocity case : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांसह 11 जणांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची बातमी समोर आली आहे. प्रकरणाची सविस्तर माहिती वाचा.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांसह १० ते ११ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पर्वती परिसरातील पुणे महापालिकेच्या अभ्यासिका आणि ग्रंथालयात अनधिकृत प्रवेश करून तोडफोड, साहित्याचे नुकसान आणि चोरी केल्याचा आरोप संबंधितांवर करण्यात आला आहे.

या घटनेबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादीला सर्वांसमक्ष जातिवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ,ॲट्रॉसिटी तसेच अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नगरसेवक सूरज लोखंडे आणि प्रिया गदादे-पाटील यांचा समावेश आहे. महापालिकेच्या सार्वजनिक वापरासाठी असलेल्या जागेतील अभ्यासिका आणि ग्रंथालयाशी संबंधित वादातून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पर्वती परिसरातील जागेवर घडल्याचा आरोप

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, पर्वती परिसरातील सर्व्हे क्रमांक १३२, पर्वती पायथा, विठ्ठलवाडी बिल्डिंगमागे, हौशीजवळ तसेच शिवाजी गदादे-पाटील यांच्या कार्यालयाशेजारी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या कॅन्टीनच्या जागेवर हा प्रकार घडला. या ठिकाणी असलेल्या अभ्यासिका आणि ग्रंथालयात फिर्यादीच्या संमतीशिवाय प्रवेश करण्यात आल्याचा आरोप आहे.

त्यानंतर तेथील साहित्याची तोडफोड करून नुकसान करण्यात आले, तसेच चोरी झाल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. सार्वजनिक वापरासाठी असलेल्या या जागेतील साहित्याचे नुकसान झाल्याने संबंधित घटनेबाबत तक्रार दाखल करण्यात आली.

फिर्यादीनुसार, संबधितांकडे कोणतीही कायदेशीर परवानगी किंवा महानगरपालिकेचे अधिकृत बजेट नसताना त्यांनी बळजोरीने व बेकायदेशीरपणे अभ्यासिका आणि ग्रंथालयात प्रवेश केला. तसेच तेथील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले आणि चोरी केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेबाबत जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेले असता, आरोपी शिवाजी गदादे पाटील यांनी पर्वती पायथा कॅनॉलच्या सार्वजनिक जागेवर अनेकांसमोर फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले.

​या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ३५९(२), ३२४(२), ३(५) आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ च्या कलम ३(१)(एस), ३(१)(आर) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट विभागाचे साहाय्यक पोलिस आयुक्त गजानन पवार करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT