Manchar Bazar Samiti-Devdatt Nikam Sarkarnama
पुणे

Ambegaon News : मोठी बातमी : वळसे पाटील समर्थक देवदत्त निकमांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली; निकम लढण्यावर ठाम

उमेदवारी नाकारल्यानंतरही ‘आपण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा फोटो वापरून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे,’ असे निकम यांनी जाहीर केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

मंचर (जि. पुणे) : मंचर बाजार समितीच्या (Bazar Samiti) निवडणुकीच्या निमित्ताने एकसंघ असणाऱ्या आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसध्ये (NCP) गटबाजी उफाळून आली आहे. बाजार समितीचे सभापती आणि शिरूर लोकसभेची निवडणूक लढवलेले माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse Patil) यांचे कट्टर समर्थक देवदत्त निकम यांनाच उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे. देवदत्त निकम यांनी मात्र आपण दिलीप वळसे पाटील यांचा फोटो वापरून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. (NCP rejected walse Patil's supporter Devdatt Nikam as a market committee candidate)

आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी राष्टवादी कॉंग्रेस पक्षाने बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रथमच बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. देवदत्त निकम यांनी आपण निवडणूक लढविणार असल्याचे सांगून एक प्रकारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या निर्णयाला आव्हान देऊन आंबेगाव तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे.

उमेदवारी नाकारल्यानंतरही ‘आपण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा फोटो वापरून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे,’ असे निकम यांनी जाहीर केले आहे. ते म्हणाले की, “राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरणे, त्यांच्या मुलाखती घेणे. या सर्व प्रक्रियेत मी होतो. पण मला उमेदवारी नाकारल्याने दुःख झाले असून मानसिक धक्का बसला आहे.

मी १९९० पासून आतापर्यंत निष्ठेने काम केले आहे. देशातील पहिली डिजिटल बाजार समिती केली. गेली सहा वर्ष शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळून देण्यासाठी तसेच शेती मालाला निवारा उपलब्ध होण्यासाठी काम केले. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समवेत आज (ता. २० एप्रिल) सकाळी चर्चाही केली. त्यांना आपण निवडणुकीतून माघार घेणार नाही, असेही सांगितले होते. त्यांनी तुम्हाला कळवतो, असे सूचित केले. पण नंतर त्यांनी आणि पक्षानेही माझ्याशी संपर्क केला नाही, अशी भावना देवदत्त निकम यांनी बोलून दाखवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT