इंदापूर (जि. पुणे) : इंदापूर (indapur) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी दाखल १५६ अर्जापैकी १० अर्ज छाननीमध्ये बाद झाले होते., तर माघारीच्या अंतिम मुदतीअखेर ११८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. चार जागांवर प्रत्येकी एकच अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित १४ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Appasaheb Jagdale-Dattatrey Bharne alliance in Indapur Bazar Samiti election)
दरम्यान, इंदापूर बाजार समितीसाठी माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादीचे (NCP) माजी मंत्री दत्तात्रेय भरणे आणि भाजप (BJP) विचाराचे सर्वजण एकत्र आले आहेत. त्यांच्या विरोधात शिंदे गटाने राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत घेऊन पॅनेल जाहीर केले आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट समोरासमोर उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जगदाळे यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेत माजी मंत्री तथा भाजपचे उमदेवार हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला होता.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी आमदार यशवंत विठ्ठल माने, व्यापारी मतदारसंघाच्या दोन जागेसाठी दशरथ नंदू पोळ, रौनक किरण बोरा व हमाल मापाडी मतदार संघाच्या एका जागेसाठी सुभाष ज्ञानदेव दिवसे यांचा प्रत्येकी एकच अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा होणे बाकी आहे.
उर्वरित १४ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. यामध्ये सोसायटी मतदारसंघातील ११ जागांपैकी सर्वसाधारणच्या ७ जागांसाठी १५ उमेदवार, महिलांच्या दोन जागांसाठी ६, एका इतर मागास प्रवर्ग जागेसाठी दोन व एका भटक्या जाती जमाती प्रवर्ग जागेसाठी ३ उमेदवारांचे अर्ज कायम राहिले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून २ सर्वसाधारण जागेसाठी ६, एका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जागेसाठी २ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत, असे एकूण 14 जागांसाठी 34 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.
शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार..
कृषी पतसंस्था सर्वसाधारण गटातून ..
आप्पासाहेब नामदेव जगदाळे, विलास सर्जेराव माने, दत्तात्रय सखाराम फडतरे, संग्रामसिंह दत्तात्रय निंबाळकर, रोहित वसंत मोहोळकर, मनोहर महिपती ढुके, संदीप चित्तरंजन पाटील
कृषी पतसंस्था महिला प्रतिनिधी
रूपाली संतोष वाबळे, मंगल गणेश कुमार झगडे
कृषी पतसंस्था विमुक्त जाती भटक्या जमाती
आबा गणपत देवकाते
कृषी पतसंस्था इतर मागास प्रवर्ग
तुषार देवराज जाधव
ग्रामपंचायत सर्वसाधारण
मधुकर विठोबा भरणे
संतोष नामदेव गायकवाड
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक
अनिल बबन बागल
स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार..
1) कृषी पतसंस्था सर्वसाधारण गटातून ..
अशोकराव शंकरराव घोगरे, महारुद्र शिवदास पाटील, सुभाष अर्जुन जगताप, तानाजीराव कृष्णराव निंबाळकर, उल्हास वसंतराव जाचक,
विलास पंढरीनाथ घोळवे, संपत भिमराव सरक,
2) कृषी पतसंस्था महिला प्रतिनिधी
सुप्रिया कैलास कोळेकर, नर्मदा विलास पवार,
3) कृषी पतसंस्था विमुक्त जाती भटक्या जमाती
बाळासाहेब सोपान चितळकर
4) कृषी पतसंस्था इतर मागास प्रवर्ग
देविदास तात्याबा भोंग
5) ग्रामपंचायत सर्वसाधारण
सुभाष किसन गायकवाड
धोंडीबा माणिक थोरात
6) ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक
तानाजी नवनाथ नरुटे
पॅनेल विरहित उमेदवार
कृषी पतसंस्था सर्वसाधारण गटातून ..
शिवाजी सत्यवान इजगुडे
कृषी पतसंस्था महिला प्रतिनिधी
संध्या विष्णू देवकर
संध्या शिवाजी इजगुडे
कृषी पतसंस्था विमुक्त जाती भटक्या जमाती
शिवाजी सत्यवान इजगुडे
ग्रामपंचायत सर्वसाधारण
तानाजी लहुदास भोंग
उल्हसराव वसंतराव जाचक
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.