Rupali Patil, Raj Thackeray
Rupali Patil, Raj Thackeray sarkarnama
पुणे

राष्ट्रवादीत गेलेल्या रुपाली ठोंबरेंनी केलं मनसेच्या उमेदवारांचे अभिनंदन

सरकारनामा ब्युरो

पुणे : राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नगर पंचायत निवडणुकीचा निकाल (Nagar Panchayat Election Result) बुधवारी लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व (Mahavikas Aghadi) असल्याचे दिसले. पण नगर पंचायतीच्या सर्वाधिक जागा भाजपच्या पारड्यात गेल्या आहेत. या निवडणुकीत भाजपाच क्रमांक एकचा पक्ष राहिल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी केला आहे.

नगरपंचायतीच्या या निवडणुकीत मनसेनेही (MNS) ग्रामीण भागात आपला झेंडा फडकवला आहे. माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत (Malshiras Nagar Panchayat Election) मनसेने (MNS) बाजी मारली आहे. चुरशीच्या लढतीत मनसेच्या रेश्मा टेळे विजयी झाल्या आहेत. मनसेच्या या विजयाचे मनसेतून राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये गेलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसे उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. याबाबत त्यांनी टि्वट केलं आहे.

मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांचे रुपाली ठोंबरे (Rupali Patil) यांनी अभिनंदन केले आहे. “माळशिरस नगरसेवकपदी मनसेतील भगिनी रेश्मा सुरेश टेळे विजयी झाल्या त्यांचे मनापासून अभिनंदन. वैचारिक मतभेद असले तरी आपल्या राजकीय संकटात पाठीशी उभा राहणाऱ्या “बापूला” माझाकडून खूप-खूप शुभेच्छा! खडकावर बाग फुलवण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणारा दिलदार भाऊ त्यांच्या संघर्षाला व संघर्षाच्या शिलेदारास माझ्या शुभेच्छा..!” असे म्हणत रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसे उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) नगरपंचायतींच्या निवडणुकीत फारसा प्रभाव दाखवू शकली नाही. मात्र नाशिक जिल्ह्यात कळवणला (Nashik) त्यांचा उमेदवार विजयी झाला. या उमेदवाराने एका बलाढ्य नेत्याचा पराभव केला आहे. यातून राज ठाकरेंच्या (Raj Thakre) संवादाचे स्मरण झाले. कळवण नगरपंचायतीत विजयी झालेल्या मनसेचा चेतन मैद हा एक साधारण कार्यकर्ता आहे. त्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही.

त्याने राजकारणात दबदबा असलेल्या सुनिल महाजन या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराचा पराभव केला तसेच नगरपंचायतीची सर्व राजकीय गणितेच बदलून टाकली. कारण महाजन हे नगाराध्यक्ष पदाचे दावेदार होते. मनसेप्रमुख राज ठाकरे एकदा अमर अकबर अँथनी चित्रपटातील अमिताभ यांच्या मारामारीत जखमी झाल्यानंतरचा संवाद म्हणाले होते, `एकही मारा, लेकीन सॅालीड मारा ना भाई` कळवणचा विजय त्या संवादाची आठवण करून देणारा आहे.

आगामी निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने संघटनात्मक बांधणी करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पूत्र अमित यांना खूपच मेहनत घ्यावी लागणार हेच या निकालाने दाखवून दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT