शिवसेनेचे दिवस वाईट, ठाकरे कुठे आहेत ; आम्ही सत्तेत बसल्यावर काय होईल

''आज सत्ता तुमची आहे तर उद्या आमची सत्ता असेल. आम्ही तर दया मायाही करत नाही.आम्ही उद्या सत्तेवर बसल्यावर काय होईल याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा,”
Nilesh Rane Uddhav Thackeray
Nilesh Rane Uddhav Thackeraysarkarnama

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या सिंधुदुर्गात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने यंदा आठ जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे. राणे यांना कुडाळमध्ये धक्का बसला आहे. ही नगरपंचायत एका मताने त्यांच्या हातून निसटली. भाजपला (BJP) आठ, शिवसेनेला (Shiv Sena) सात तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहे. भाजपच्या एका उमेदवाराचा एका मताने पराभव झाला आहे.

कोकणातील नगरपंचायतीच्या निकालाबाबत भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी कुडाळ येथे कार्यकर्त्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर (Thackeray government) हल्लाबोल केला. ते म्हणाले, ''संपूर्ण राज्यात भाजपाचे सर्वात जास्त सदस्य निवडून आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी आणि तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेनेचे दिवस वाईट आहेत,''

निलेश राणे म्हणाले, '' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे आहेत हे मला शोधून दाखवा. आज सत्ता तुमची आहे तर उद्या आमची सत्ता असेल. आम्ही तर दया मायाही करत नाही. म्हणून आम्ही उद्या सत्तेवर बसल्यावर काय होईल याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा,”

राणेंनी राष्ट्रवादीचे नेते, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली. राणे म्हणाले, “महाविकास आघाडीतील लोकांनी कितीही घाणेरडे कृत्य केले तरी हे लोक त्यांना वाचवण्यासाठीच बघतात. धनजंय मुंडेंचे कुठे काय काय ठेवले आहे हे त्यांनाच माहिती नाही. कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार घेत नाहीत,''

''नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी कोकणात उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सतेज पाटील येऊन गेले. त्यामुळे हा पराभव आमचा नसून सत्ताधाऱ्यांचा आहे. या पराभवाला खासदार विनायक राऊत जबाबदार आपण पालकमंत्री, खासदार आमदार यांच्याविरोधात लढलो. महाविकास आघाडीकडे एवढं साम्राज्य असतांनाही त्यांना सत्ता स्थापन करता येत नाही, हे आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकीत दिसले.'' असे निलेश राणे म्हणाले.

दापोली (Dapoli) आणि मंडणगडमध्ये शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांना मोठा धक्का दिल्याचे चित्र आहे. दापोली नगरपंचायत निवडणुकीतील एकूण जागांपैकी शिवसेनेनं 6 जागांवर विजय मिळवला आहे. अनिल परब (Anil Parab) यांच्या पाठिंब्यातून 11 पैकी 9 जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादीला विजय मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com