Ashwini Kadam, Sachin Dodke Sarkarnama
पुणे

Ashwini Kadam and Sachin Dodke : खडकवासला मतदारसंघातून सचिन दोडके, तर पर्वतीमधून अश्विनी कदम यांना उमेदवारी जाहीर!

Parvati and Khadakwasla constituency News : दोन्ही विधानसभा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे ; ही बंडखोरी कशी शमवली जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Sudesh Mitkar

NCP Sharad Pawar Pune candidate list : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पुणे शहरातील दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

खडकवासला आणि पर्वती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने स्वतःकडे राखल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये चढाओढ सुरू असल्याचे पाहायला मिळालं मात्र अखेर या दोन्ही मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने(NCP) सचिन दोडके यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सचिन दोडके यांचा अवघ्या तीन हजार मतांनी पराभव झाला होता. मात्र पक्षाने यंदा त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच खडकवासला विधानसभा अध्यक्ष काका चव्हाण यांनी आव्हान दिलं होतं. यंदा आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात फील्डिंग देखील लावली होती.

तसेच हा विधानसभा मतदारसंघ शिवसेना(Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्याकडे ठेवण्यासाठी इच्छुक होता. या विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे हे इच्छुक होते. हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सुटल्याने वसंत मोरे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

तर दुसरीकडे पर्वती विधानसभा मतदारसंघाचा विचार केलास हा मतदारसंघ काँग्रेस आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही होता. काँग्रेसकडून(Congress) या विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते आबा बागुल हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. ,मात्र अश्विनी कदम यांना उमेदवारी जाहीर झाल्याने आबा बागुल हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

त्यामुळे आगामी काळामध्ये या दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे नेते बंडखोरी करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT