Sharad Pawar speaking at a public event, recalling how he toppled Vasantdada Patil’s government in the 70s a turning point in Maharashtra politics. Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : 'होय वसंतदादांचं सरकार मीच पाडलं..., पण का?' पहिल्यांदाच जाहीर कबुली देत शरद पवारांनी सांगितलं 70 च्या दशकातील राजकारण

Vasantdada Patil government : "वसंतदादा पाटील हे आमचे नेते होते. मात्र वसंतदादा पाटील हे इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि आमचा इंदिरा काँग्रेसला विरोध होता. वसंतदादा पाटील यांचे आम्हाला मार्गदर्शन सातत्याने मिळत असे. ही मोठ्या मनाची माणसे होती. या सर्व लोकांचे अंतकरण मोठे होते."

Sudesh Mitkar

Pune News, 17 Aug : राज्यामध्ये 2019 मध्ये आलेल्या महाविकास आघाडीचे सरकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे कशा प्रकारे पडलं याबाबतच्या चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात सुरू असल्याच्या पाहायला मिळतात.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील वसंतदादा पाटील यांचे सरकार कशाप्रकारे पाडलं होतं याबाबत अलीकडच्या काळामध्ये जास्त चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता या आठवणींना एका कार्यक्रमात शरद पवारांनी उजाळा देत आपणच वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडल्याची जाहीर कबुली दिली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमाला पवार यांनी उपस्थिती लावली. शरद पवार यांच्यावर सातत्याने वसंतदादा पाटील यांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला जातो. आता शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार आम्ही कसे व का पाडले याबाबतचा किस्सा सांगितले आहे.

शरद पवार म्हणाले, वसंतदादा पाटील हे आमचे नेते होते. मात्र वसंतदादा पाटील हे इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि आमचा इंदिरा काँग्रेसला विरोध होता. वसंतदादा पाटील यांचे आम्हाला मार्गदर्शन सातत्याने मिळत असे. ही मोठ्या मनाची माणसे होती. या सर्व लोकांचे अंतकरण मोठे होते. यांनी महाराष्ट्रात एक मोठी नेतृत्वाची फळी निर्माण केली होती.

त्यामुळे महाराष्ट्र देशात एक चांगले राज्य म्हणून लौकिक मिळवू आणि टिकू शकला आणि महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला. मला आठवतंय आम्ही काँग्रेसमध्ये होतो. त्यानंतर काँग्रेस दुभंगली. इंदिरा आणि स्वर्णसिंग काँग्रेस वेगवेगळ्या झाल्या. आम्ही स्वर्णसिंग काँग्रेसमध्ये आलो. या काँग्रेसमध्ये यशवंतराव चव्हाणसाहेब सुद्धा होते.

यानंतर झालेल्या निवडणुकीत कोणीही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. इंदिरा काँग्रेस आणि आम्हाला काही जागा मिळाल्या. यामुळे आम्ही एकत्र आलो आणि वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री केले. मात्र, आमचा तरुणांचा इंदिरा काँग्रेसवर राग होता. आम्ही सगळे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचे त्यामुळे आमच्यात एक अंतर होते.

वसंतदादा हे आमचे नेते होते. वसंतदादांनी दोन्ही काँग्रेस एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू केला. याला आमचा विरोध होता. परिणाम असा झाला की, आम्ही ठरवले वसंतदादांचे सरकार घालावयाचे. वसंतदादांचे सरकार आम्ही घालवले आणि मी त्यावेळी मुख्यमंत्री झालो मी माझ्या हातात राज्याची सत्ता आली अस शरद पवार म्हणाले.

आता हे सांगायचं कारण म्हणजे, नंतर 10 वर्षांनी आम्ही पुन्हा सर्व एकत्र आलो. राज्याचा मुख्यमंत्री कुणाला करायचे घेण्यात आली यामध्ये वसंतदादा यांच्या सह रामराव अदिक, शिवाजीराव निलंगेकर आणि अनेक नेते होते. त्या बैठकीत अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र, वसंतदादांनी सरळ सांगितले, बाकी कुणाच्या नावाची चर्चा नाही.

आज पुन्हा पक्ष सावरायचं आहे. तो सावरायचा असेल तर नेतृत्व शरदकडे द्यायचे. म्हणजे ज्या व्यक्तीचे सरकार मी पाडले, ती व्यक्ती गांधी-नेहरूंचा विचार मजबूत करण्यासाठी आम्ही काय केले हे विसरून मोठ्या अंतःकरणाने पुन्हा एकत्र येते. असे नेतृत्व त्याकाळी काँग्रेसमध्ये होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT