Voter List Fraud : मतदारयादीतील घोळाचा भांडाफोड काँग्रेसवरच बुमरँग होणार?; माजी मुख्यमंत्र्यांवर बोगस व्होटिंगचे आरोप

Karad South constituency : माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या स्वीय सहायकांचे कुटुंबीय आणि त्यांच्या भावाचे कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दोन गावांतील मतदार यादीत नाव आहे.
Prithviraj Chavan And his personal assistant
Prithviraj Chavan And his personal assistant Sarkarnama
Published on
Updated on

Karad, 16 August : लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बोगस मतदानावरून देशभरात रान उठवलेले असतानाच आता भाजपने खुद्द काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या स्वीय सहायकांचे कुटुंबीय आणि त्यांच्या भावाचे कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दोन गावांतील मतदार यादीत नाव आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत दोनवेळा मतदान केले आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते मोहन जाधव यांनी करून त्याला पृथ्वीराज चव्हाण यांची मूकसंमती होती का, असा सवाल केला आहे. कऱ्हाड दक्षिणच्या माध्यमातून बोगस मतदानाचा डाव काँग्रेसवरच उलटवण्याची खेळी भाजपकडून सुरू आहे.

दुबार मतदार नोंदणीवरून घेण्यात आलेल्या आक्षेपाच्या पार्श्वभूमीवर आम्ही कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीचे अवलोकन केले. त्या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे स्वीय सहायक स्वीय सहायक गजानन आवळकर आणि त्यांची पत्नी, भाऊ यांचे मतदान वाठार आणि कराड या दोन ठिकाणी आढळून आले आहे. बोगस मतदानासाठीच आपल्या पदाचा गैरवापर करत त्यांनी हे कृत्य केल्याचा आमचा स्पष्ट आरोप. याबाबतची वस्तुस्थिती आम्ही कागदोपत्री पुराव्यानिशी देत आहोत, असेही मोहन जाधव यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील (Karad South constituency) वाठार आणि कराड केंद्रात आवळकर यांचे नाव मतदारयादीत आहे. वाठार मतदान केंद्रावरील यादीत १३५९ व्या क्रमांकावर गजानन शंकर आवळकर (वय ६३), तसेच १३५८ व्या क्रमांकावर संगीता गजानन आवळकर (वय ५६); तर ७१७ व्या क्रमांकाच्या ठिकाणी जयप्रकाश शंकर आवळकर (वय ४९) यांचे नाव नमूद आहे.

कराड शहरातील भाग क्रमांक १२७ मध्ये गजानन शंकर आवळकर (वय ६२) यांचे नाव ५७३ व्या क्रमांकावर, तर संगीता गजानन आवळकर (वय ५४) यांचे नाव ५७४ व्या क्रमांकावर; तर जयप्रकाश शंकर आवळकर (वय ४८) यांचे नाव दिसून येत आहे. या तिघांनी बोगस मतदान करण्यासाठी दोन ठिकाणी आपले नावे नोंदविली आहेत, असा आमचा आरोप आहे, असेही भाजपने म्हटले आहे.

मोहन जाधव म्हणाले, मतदारयादीत दुबार नोंद असलेले गजानन शंकर आवळकर हे सामान्य व्यक्ती नाहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे ते स्वीय सहाय्यक आहेत. त्यांनी स्वतःबरोबरच पत्नीचे आणि भावाचे नावही वाठार, तसेच कराड अशा दोन्ही मतदान केंद्रावर ठेवून बोगस मतदान केल्याचा आमचार आरोप आहे.

Prithviraj Chavan And his personal assistant
Jayant Patil : महायुतीच्या दोन बड्या नेत्यांसमोर जयंतरावांचे सूचक विधान; ‘वाळवा तालुका सहजासहजी वाकत नाही, कोणाला शरण जात नाही...’

आवळकर कुटुंबीयांच्या दुबार मतदारनोंदणीबाबत मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आक्षेप घेण्यात आला होता. त्यावेळी आवळकर यांनी पदाचा आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वरदहस्ताचा वापर करून ही दुबार मतदारनोंदणी रद्द करू नये, यासाठी मोठा खटाटोप केला. त्यांच्या दबावामुळेच एका बीएलओ प्रतिनिधीला घाबरुन राजीनामा द्यावा लागला होता, हे सर्वत्र सर्वश्रुत आहे. आवळकर कुटुंबीयाने दोन्ही केंद्रावर मतदान केल्याचा आरोपही भाजपने केला आहे.

कराड दक्षिण मतदासंघाच्या वाठार आणि कराड येथील मतदार यादीत या तिघांची नावे नोंदविताना जे वय नमूद केले आहे. त्याही तफावत आढळून येत आहे. त्यामुळे ही नावे नोंदविताना गजानन आवळकर यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बोगस आधार कार्ड अथवा तत्सम कागदपत्रांचा आधार घेतला का?, याचीही चौकशी करावी. याच आवळकरांनी मतदारयादीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्या व्यक्तीने स्वतःच घोळ केला आहे, तो कुठल्या तोंडाने उच्च न्यायालयात गेला आहे? असा सवालही भाजपने केला आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीय सहायक गजानन आवळकर यांनी राजकीय बळाचा वापर करत संपूर्ण कराड दक्षिण मतदारसंघात आणखी किती जणांची दुबार नोंदणी केली आहे? त्याला माजी मुख्यमंत्री चव्हाण यांची मूकसंमती होती का? बोगस कागदपत्रे वापरुन, खोट्या वयाची नोंद करुन दुबार मतदार नोंदणी केल्याबद्दल या मतदारांवर गुन्हे दाखल करावेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही मोहन जाधव यांनी केली आहे.

Prithviraj Chavan And his personal assistant
Ajit Pawar : अजितदादांनी रोहित पवारांना दुसऱ्यांदा सुनावले; ‘भावकीकडं लक्ष दिलं, म्हणूनच तू आमदार झालास’

पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसने नेमलेल्या मतदार सत्यशोधन समितीचे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मतदार यादीत काही घोळ झाला आहे का? याची पडताळणी केली जात आहे. मग या पडताळणीत त्यांना आपल्या स्वीय सहायकानेच केलेला घोळ दिसला नसेल का? की दिसूनही त्यांनी जाणीवपूर्वक कानाडोळा केला का, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com