Mahavikas Aghadi's Leader Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : ठाकरेंच्या भेटीनंतर शरद पवारांनी एका वाक्यात सांगितले.. ; "आमची मते वेगळी ..

Sharad Pawar meeting with Uddhav Thackeray : बंद दाराच्या आड जवळपास सव्वा तास चर्चा झाली. यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

NCP Sharad Pawar discussed meeting with uddhav thackeray : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी (ता. ११ एप्रिल) बंद दाराच्या आड जवळपास सव्वा तास चर्चा झाली. यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

महाविकास आघाडीमध्ये सारे काही आलबेल नाही, अशा प्रकारच्या चर्चांवर पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली. याबाबत एका वाक्यात शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी मंगळवारी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. बराच वेळ झालेल्या या बैठकीत काय चर्चा झाली ? असा प्रश्न पत्रकारांशी त्यांना विचारला होता.

त्यावर शरद पवार म्हणाले, "आपापल्या पक्षाची भूमिका वेगवेगळी असली तरी महाविकास आघाडी म्हणून त्यातील सर्व पक्षांनी एका विचाराने काम करावं यावर आमची चर्चा झाली आहे, त्यानुसार काही कार्यक्रम आखले आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आमचे ठरलं आहे.

"आम्ही एकत्र काम करतो, काही विषयावर वेगळी मते असली तरी सगळ्यांनी एका विचाराने काम करावे, अशी चर्चा झाल्याचे पवारांनी सांगितले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत बोलताना शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी टीका करीत आहे.

“मातोश्रीचा इतिहास आहे, कितीही मोठा नेता असला तरी बाळासाहेबांना भेटायला येत होते. पण आज वेदना झाल्या. आज मराठी बाणा, बाळासाहेब यांचा वारसा सोडून लोटांगण घालत सिल्व्हर ओकला दाखल झाले. शिवसैनिकांना वेदना झाल्या आहेत. सावरकर यांच्याबद्दल जे वक्तव्य करण्यात आले त्यावर भूमिका मांडली नाही. जेपीसीबाबत संजय राऊत भूमिका मांडतात पण याच मुद्द्यावर पवार गरज नसल्याचे सांगतात. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये दरी पडण्यास सुरूवात झाली आहे,” असे देसाई म्हणाले.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT