Ajit Pawar , Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : अजितदादांचा 'तो' दावा शरद पवारांनी खोडून काढला..; घड्याळ चिन्हाला..

NCP News : मी कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे.

सरकारनामा ब्युरो़

Pune News : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याबाबतची भूमिका मांडली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्हावर दावा केला.

अजित पवार यांचा हा दावा शरद पवारांनी खोडून काढला. शरद पवार हे पत्रकार परिषदेत बोलत होते. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं.

ते म्हणाले, "घड्याळ चिन्हाला काही होणार नाही," अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय बोलणार याकडे देशाचे लक्ष लागले होते. त्यावर शरद पवारांनी सविस्तर सांगितले.

"राष्ट्रवादी काँग्रेस भष्ट्राचारी आहे, असा आरोप काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रीमंडळात घेतले आहे, त्यामुळे मोदींनी केलेल्या आरोपातून राष्ट्रवादी मुक्त झाली आहे, त्यामुळे मोदींचे मी आभार मानतो, असे पवार म्हणाले. अजित पवारांनी बंड केल्याचे पवार म्हणाले. आज जो प्रकार घडला त्यांची मला चिंता नाही. आजचा दिवस संपला. उद्या (सोमवारी) मी कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे, असे पवार म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले...

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही काम करणार आहोत, घड्याळ चिन्हावरच आम्ही निवडणुका लढणार आहोत. देशपातळीवरील सध्या जी परिस्थिती आहे, त्याच्या विचार केला असता विकासाला महत्व दिले पाहिजे, हे सर्व सहकाऱ्यांचे मत होते," असे अजित पवार म्हणाले.

"नऊ वर्षांपासून मोदी सरकार काम करीत आहे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.मोदींमुळे देशाचा विकास होत आहे. राज्यामध्ये विकासाला महत्व दिले पाहिजे, त्यामुळे राज्यात मजबूत खंबीर नेतृत्वाची गरज आहे. केंद्रीय निधी कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केला जाईल," असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही काम करणार आहोत, घड्याळ चिन्हावरच आम्ही निवडणुका लढणार आहोत. देशपातळीवरील सध्या जी परिस्थिती आहे, त्याच्या विचार केला असता विकासाला महत्व दिले पाहिजे, हे सर्व सहकाऱ्यांचे मत होते.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT