Sharad Pawar on Ajit Pawar : राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवार म्हणाले, "जे घडलं त्यांची मला चिंता... ; मोदींचे मी आभार मानतो..

Maharashtra Politics : मोदींनी केलेल्या आरोपातून राष्ट्रवादी मुक्त झाली आहे.
Sharad-Pawar- Narendra Mod
Sharad-Pawar- Narendra Mod Sarkarnama
Published on
Updated on

Deputy CM Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय बोलणार याकडे देशाचे लक्ष लागले होते.

"राष्ट्रवादी काँग्रेस भष्ट्राचारी आहे, असा आरोप काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रीमंडळात घेतले आहे, त्यामुळे मोदींनी केलेल्या आरोपातून राष्ट्रवादी मुक्त झाली आहे, त्यामुळे मोदींचे मी आभार मानतो, असे पवार म्हणाले. अजित पवारांनी बंड केल्याचे पवार म्हणाले. पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

आज जो प्रकार घडला त्यांची मला चिंता नाही. आजचा दिवस संपला. उद्या (सोमवारी) मी कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे, असे पवार म्हणाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही काम करणार आहोत, घड्याळ चिन्हावरच आम्ही निवडणुका लढणार आहोत. देशपातळीवरील सध्या जी परिस्थिती आहे, त्याच्या विचार केला असता विकासाला महत्व दिले पाहिजे, हे सर्व सहकाऱ्यांचे मत होते. नऊ वर्षांपासून मोदी सरकार काम करीत आहे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.मोदींमुळे देशाचा विकास होत आहे. राज्यामध्ये विकासाला महत्व दिले पाहिजे, त्यामुळे राज्यात मजबूत खंबीर नेतृत्वाची गरज आहे. केंद्रीय निधी कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केला जाईल," असे अजित पवार म्हणाले.

"शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुसंख्य आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला.जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो. बहुतांश नेत्यांना माझा निर्णय मान्य. पक्षाचे चिन्ह व नाव आमच्याकडेच, आम्ही पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवू. पक्ष अधिक मजबूतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार. सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे," असे अजितदादांनी स्पष्ट केलं.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com