Pune News : पुणे जिल्ह्यातून पंढरपूर वारीसाठी निघालेल्या वारकरी भजनमंडळींवर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास दुर्दैवी आणि अत्यंत धक्कादायक घटना घडली. हे वारकरी चहा पिण्यासाठी थांबले असता दोन अज्ञात तरुणांनानी कोयत्याचा धाक दाखवून, तसेच डोळ्यात मिरची पूड फेकून वारकरी महिलांच्या अंगावरील सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने लुटले.
तसेच मंडळासोबत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार करण्यात आली ची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत.
या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून थेट गृहमंत्र्यांना काही सवाल विचारण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणात वारकऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाक घासून माफी मागावी, अशी मागणी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पार्टी शरचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप म्हणाले, इतिहासात कधीही न घडलेली घटनास्पद घटना काल घडली. गेल्या शेकडे वर्षांपासून निर्विघ्नपणे सुरू असलेल्या आषाढी वारीला काल पहिल्यांदाच गालबोट लागले. आषाढी वारीसाठी, पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या एका चिमुकलीचा दौंड जवळ काही नराधमांनी बलात्कार केला. यासोबतच वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांचे दागिनेही लुटले.
गेल्या काही वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी आहे. त्यांच्याकडे इतकी मोठी जबाबदारी असताना ते स्वतः मात्र केवळ सभा-समारंभ, पक्षफोडी, पक्षप्रवेश अशा विलासी राजकारणात रममान झाले आहेत. त्यांच्या या निष्क्रियतेमुळे संपूर्ण महाराष्ट्र भयभीत असताना आता निष्पाप वारकऱ्यांनाही त्यांच्या निष्क्रियतेचा फटका बसू लागला आहे.
चिमुकल्या वारकरी मुलीवर बलात्कार करणारे नराधम अजूनही मोकाट असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अजूनही काही वक्तव्य केलेले नाही. घडलेल्या घटनेची जबाबदारी स्वीकारून पदत्याग करण्याची नैतिकता देवेंद्र फडणवीस यांच्यात शिल्लक नाही. किमान त्यांनी पांडुरंगाच्या चरणी नाक घासून समस्त वारकऱ्यांची माफी मागावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी आहे, असंही जगताप म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.