Suniel Shetty Pakistan artist ban : पहलगामच्या घटना विसरता न येणारी; सुनील शेट्टी यांची आता पाकिस्तानी कलाकारांबाबत मोठी प्रतिक्रिया

Suniel Shetty Reacts on Ban of Pakistani Artists After Shirdi Sai Samadhi Visit : पहलगामच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, भारतात पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालणे योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता सुनील शेट्टी यांनी दिली.
Suniel Shetty Pakistan artist ban
Suniel Shetty Pakistan artist banSarkarnama
Published on
Updated on

India Pakistan film relations : “पहलगामच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, भारतात पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालणे योग्यच आहे. देशाने आपण होऊन कधीही युद्धाला सुरुवात केली नाही.

परंतु आता कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. चित्रपट क्षेत्रात देखील पाकिस्तानी कलाकार घेण्यास बंदी घालण्याचा निर्णय योग्यच आहे," असे स्पष्ट मत अभिनेता सुनील शेट्टी यांनी शिर्डीत व्यक्त केले. त्यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

सुनील शेट्टी म्हणाले, गेल्या सहा वर्षांपासून माझी पत्नी दरवर्षी शिर्डीत (Shirdi) दर्शनासाठी येते. यंदा मात्र मला साईबाबांनी बोलावल्यासारखे वाटले. साईसमाधीचे दर्शन घेताना डोळे पाणावले. मी आतापर्यंत कधी काही मागितले नाही. यावेळी माझ्या आईसह कुटुंबाचे आणि देशातील सर्वांचेच आरोग्य चांगले राहावे, अशी साईबाबांकडे प्रार्थना केली.

पुढे ते म्हणाले, माझी जन्मभूमी कर्नाटक असली, तरी कर्मभूमी मुंबई (Mumbai) आहे. मला मराठी बोलता आले पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पहिलीपासून हिंदी शिक्षणाला विरोध करताना महाराष्ट्रात मराठीच महत्त्वाची आहे, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर सुनील शेट्टी यांनी मराठीला पाठिंबा दर्शवत हिंदी सक्तीला विरोध दर्शवला. हिंदू धर्माची शिकवण धर्म, सेवा आणि कर्म आहे. माझे सर्व चित्रपट संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहू शकेल, असे असतात. भाषा कोणतीही असो, असेच चित्रपट सर्वत्र तयार झाले पाहिजेत, असे मत त्यांनी मांडले.

Suniel Shetty Pakistan artist ban
Anil Parab vs Yogesh Kadam : अनिल परबांनी 'ती' पाच प्रकरणं काढत शिवसेना मंत्र्यावर 'घाव'च घातला; बावनकुळे निलंबनाची कारवाई करणार का?

लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘हेराफेरी ३’ या चित्रपटाबद्दल विचारले असता, ते म्हणाले, सध्या मी काही बोलणार नाही. माझा नव्वदच्या दशकातील ‘बलवान’ चित्रपट लोकांच्या आजही लक्षात आहे. त्यामागे त्यातील संगीताचा मोठा वाटा आहे.

Suniel Shetty Pakistan artist ban
Nana Patole Vs Praful Patel : नानाभाऊंना प्रफुल पटेलांचा पुन्हा धोबीपछाड : दूध संघानंतर गोंदिया जिल्हा बँकेतही चारली धूळ

आपले प्रेरणास्थान कोण, या प्रश्नावर सुनील शेट्टी यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना आदर्श मानत असल्याचे सांगितले. प्रत्येकाला आयडॉल आणि गुरू आवश्यक असतात. तेच आपल्याला योग्य वाट दाखवतात. साईबाबा माझ्यासाठी गुरू आहेत, असे ते म्हणाले. सुनील शेट्टी यांच्या स्वागतासाठी साईसंस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com