Harshvardhan Patil  Sarkarnama
पुणे

NCP Protest Pune : 'किती माणसं डेड झाल्यावर लाईन दिसेल?' हर्षवर्धन पाटील सरकारवर भडकले; पुण्यात 'एल्गार'

Maharashtra Youth Issues News : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा पार पडला.

Sudesh Mitkar

Pune News : राज्यातील वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुण्यात जोरदार निदर्शने करत 'बेरोजगार हक्क एल्गार' रॅलीचे आयोजन करण्यात आले. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा पार पडला.

या रॅलीदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. तरुणांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि दहा प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, 'MIDC साठी स्थानिकांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या. जमिनी देताना स्थानिकांना रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु आज अनेक स्थानिक तरुण अजूनही बेरोजगार आहेत. पेपर फुटीची प्रकरणे आणि इतर विविध समस्यांमुळे तरुणांचे भविष्य अंधारात सापडले असून त्यांच्या मनात सरकारविरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे. सरकारने बेरोजगारीवर अनेक डेडलाईन्स दिल्या आहेत. आता किती माणसे डेड झाल्यानंतर सरकारला ही लाईन दिसेल?" असा संतप्त सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला.

बेरोजगारीच्या प्रश्नावर अनेक उपाय उपलब्ध आहेत, मात्र सरकारने ऐकून घेतले पाहिजे. सरकारने आम्हाला चर्चेला बोलवावे, असे आवाहनही त्यांनी केले. सरकार तरुणांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या मोर्चात पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोहोचवून सरकारने या ज्वलंत प्रश्नांवर तत्काळ ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT