<div class="paragraphs"><p>Sunil Tingre-Prashant Jagtap</p></div>

Sunil Tingre-Prashant Jagtap

 

Sarkarnama

पुणे

सर्व २७ जागा राष्ट्रवादीला जिंकून देतो; वडगाव शेरीला महापौरपद द्या : टिंगरेंनी मागितला शब्द

अन्वर मोमीन

वडगाव शेरी (पुणे) : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत नगर रस्ता भागातील नगरसेवकांच्या २७ जागा तुम्हाला जिंकून देतो. भाजपला एकही जागा मिळू देणार नाही. पण, महापौरपद मात्र वडगाव शेरीला देण्याचा शब्द द्या, अशी गळ आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांना घातला. (NCP wins 27 seats on Nagar Road; Give the mayor post to Wadgaon Sheri)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती अधिकार सेलचे कार्याध्यक्ष आशिष माने यांच्या वडगाव शेरी येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनावेळी आमदार टिंगरे यांनी वरील मागणी केली. या वेळी खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख उपस्थित होते.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अद्याप प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे नक्की किती प्रभाग आणि कसे होतील. निवडणूक नेमकी केव्हा होणार. महाविकास आघाडी एकत्र लढणार का, हेही अद्याप नक्की नाही. मात्र, जनसंपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनाचे निमित्त साधून राष्ट्रवादीने नगर रस्ता भागात प्रचाराचे रणशिंग फुंकल्याप्रमाणे जाहीर सभा घेतली.

वडगाव शेरी येथे सभा असल्यामुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. स्थायी समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर मुळीक यांनी चारशे कोटींचा निधी आणला, असा दावा केला आहे. मग तो निधी नक्की गेला कुठे, वडगाव शेरीचा विकास का दिसत नाही, असा सवाल करीत आगामी निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादी सोबत उभे राहण्याचे आवाहन केले.

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत नगर रस्ता भागातील संभाव्य 27 नगरसेवकांच्या जागा आपण जिंकून दाखवू फक्त वडगावशेरीला महापौरपद देण्याचा शब्द सगळ्यांसमोर आम्हाला द्या, अशी गळच आमदार सुनील टिंगरे यांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना जाहीर सभेत घातली. आमदार सुनील टिंगरे म्हणाले, ‘‘हडपसर विधानसभा मतदारसंघाऐवजी महापौर मतदारसंघ म्हणावे लागेल इतक्या वेळा हडपसरला महापौरपद मिळाले आहे, त्यामुळे आता महापौरपदाची बारी वडगाव शेरीची आहे.’’

जाहीर सभेत आमदार सुनील टिंगरे यांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडे शब्द मागितला खरा. परंतु आता प्रशांत जगताप यांनी तसा शब्द दिला का, हे मात्र जाहीर सभेत समजू शकले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT