ncp workers
ncp workers sarkarnama
पुणे

आंबेगावमध्ये शिवसेना-भाजपचे पानिपत; राष्ट्रवादीने मिळवला एकहाती विजय

सुदाम बिडकर

पारगाव : अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील सुभाष विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची (Society Election) पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष अँड विष्णू काका हिंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) सर्वच्या सर्व १३ जागा जिंकुन एकहाती सत्ता मिळवली. या निवडणुकीत शिवसेना (ShivSena)भाजप (BJP) उमेदवारांचा दारूण पराभव झाला.

शनिवारी मतदान झाले त्या नंतर सायंकाळी लगेचच मतमोजणीला झाली. रात्री उशिरा पर्यंतसर्व जागांचे निकाल जाहीर झाले. एकूण १३ जागेसाठी ३२ उमेदवार उभे निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीमध्ये अँड विष्णू काका हिंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामदैवत श्री भैरवनाथ ग्रामविकास पँनेलने सर्वच्या सर्व १३ जागा लढवल्या. तर शिवसेनेच्या वतीने शिवसेना उपतालुका प्रमुख कल्याण हिंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री भैरवनाथ सहकार पँनेलनेही सर्व १३ जागा लढवल्या होत्या. तर भाजपच्या वतीने तालुका उपाध्यक्ष गुलाब हिंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जय मल्हार शेतकरी विकास पँनेल पाच जागा लढवल्या होत्या.

शिवाजी हिंगे हे एक अपक्ष हि उभे होते. तिन्ही प्रमुख पक्षांनी हि निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. विजयी उमेदवार पुढील प्रमाणे सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी : आशितोष हिंगे, श्रीहरी हिंगे, ज्ञानेश्वर एलभर, उत्तम तुकाराम टाव्हरे, बाळासाहेब टाव्हरे, बबनराव हिंगे, संतोष शेटे, दशरथ हिंगे. अनुसूचित जाती/जमाती-भिवाजी गायकवाड. महिला प्रतिनिधी जागा दोन-पुजा मेंगडे, इंदुबाई हिले. इतर मागास प्रवर्ग-विनायक फल्ले, भटक्या विमुक्त जाती जमाती-कुंडलिक जारकड.

निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांना फेटा बांधून गुलाल उधळत मिरवणूक काढली. या वेळी अँड विष्णू काका हिंगे, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक शांताराम हिंगे, शरद बँकेचे माजी संचालक संजय चव्हाण, सरपंच पवन हिले, उपसरपंच सचिन हिंगे, टाव्हरेवाडीचे सरपंच उत्तम टाव्हरे, सचिन छबनराव हिंगे, योगेश चव्हाण, सागर हिंगे, प्रशांत वाडेकर, अनिल हिंगे, सुनील पाटील हिंगे, प्रशांत बबनराव हिंगे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT