पिंपरी : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असेपर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपमधून आऊटगोईंग,तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इनकमिंग सुरु होते. मात्र, राज्यात सत्ताबदल होताच हे प्रवेशाचे चक्रही आता उलटे झाले आहे.
राज्यात भाजप (BJP) सत्तेत आल्याने या पक्षात आता इनकमिंग आणि राष्ट्रवादीतून (NCP) आऊटगोईंग सुरु झाले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय महासचिव आणि फॉरेन अफेअर कनव्हेनर डॉ. गणेश अंबिके (Ganesh Ambike) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला. (MLA Laxman Jagtap & Chandrashekhar Bawankule Latest News )
भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील निवासस्थानी हे पक्षात इनकमिंग झाले. आमदार जगताप, शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि जगतापांचे बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणुक प्रमुख शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण शहरभर पक्ष वाढविण्यासाठी आपण काम करणार असल्याचे प्रवेशानंतर अंबिके यांनी सांगितले. यावेळी शंकर जगताप, भाजपचे शहर सरचिटणीस राजू दुर्गे, अॅड. मोरेश्वर शेडगे, पिंपरी पालिकेतील माजी पक्षनेते नामदेव ढाके तसेच सदाशिव खाडे आदी उपस्थित होते.
जीवघेण्या आजाराशी रुग्णालयामध्ये पन्नास दिवस यशस्वी मुकाबला करून घरी परतलेल्या जगतापांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी बावनकुळे आज आले होते. पालिका निवडणुकीचा प्रश्न न्यायालयात असल्याने तोपर्यंत आराम करून निवडणुकीच्या वेळी फीट व्हा,असे ते यावेळी आमदार जगतापांना म्हणाले.
दरम्यान, आमदार जगतापांच्या प्रेमापोटी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे डॉ.अंबिके यांनी प्रवेशानंतर `सरकारनामा`ला सांगितले. ते राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षात होते. कुठल्याही पदाच्या हव्यासापोटी आपण राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी महापालिका निवडणूक लढणार नसून पक्ष संघटनेसाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.