Rajesh Pande Sarkarnama
पुणे

ना बापट ना बीडकर...पांडेंकडे दिली भाजपाने निवडणुकीची सूत्रे

मितभाषी असलेले पांडे हे गेल्या 30 वर्षांपासून संघ परिवारात सक्रिय आहेत.

सरकारनामा ब्युरो

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीमध्ये पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता राखण्यासाठी शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे (Rajesh Pande) यांची पक्षाने महापालिका निवडणूक प्रमुख या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. खासदार गिरीश बापट (Girish Bapat) किंवा सभागृह नेते गणेश बीडकर (Ganesh Bidkar) यांच्याकडे सूत्रे न देता संघटनेत महत्वाच्या असणाऱ्या पांडे यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

पुण्यातील निवडणुकीतील भाजपची सूत्रे कोणाकडे जाणार याची उत्सुकता होती. खासदार गिरीश बापट किंवा पालिकेतील कोणत्या तरी पदाधिकाऱ्याला सहप्रभारी म्हणून जबाबदारी मिळणार, याची चर्चा होती. प्रत्यक्षात बापट आणि महापौर मुरलीधर मोहोळ, गटनेते गणेश बीडकर यांच्यापैकी कोणाकडेही जबाबदारी न देता पांडे यांचे पुढे करण्यात आले आहे. पर्यायाने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडेच सारी सूत्रे राहणार असल्याचेही पांडे यांच्या निवडीमुळे स्पष्ट झाले आहे. चंद्रकात पाटील यांनी गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली पुण्याची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही.

मितभाषी असलेले पांडे हे गेल्या 30 वर्षांपासून संघ परिवारात सक्रिय आहेत. मूळचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले पांडे अकरावीमध्ये शिक्षणासाठी पुण्यात आले. तेव्हापासूनच ते पुण्यात आले. करियरच्या सुरवातीच्या टप्प्यात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होते.

एमकॉम, एमफिलपर्यंत शिक्षण झालेले पांडे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे ही सदस्य आहेत. मुंबई महापालिकेमध्ये सत्ता मिळवण्यासाठी पक्षाने अशिष शेलार यांची नियुक्ती केली आहे, त्याच धर्तीवर पुण्यासाठी पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार असून सहा आमदार आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेत शंभर नगरसेवक आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आव्हान परतावून लावण्यासाठी पांडे यांच्यावर भाजपची पुण्यातील सत्ता राखण्याची मोठी जबाबदारी पडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT